जिल्हाधिकाऱ्यांना कांदा भेट
By admin | Published: May 10, 2016 12:06 AM2016-05-10T00:06:22+5:302016-05-10T00:28:34+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना कांदा भेट
नाशिक : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जय किसान फार्मर्स फोरमने जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांना कांद्याची गोणी भेट देऊन मागणीची तड लावण्याची विनंती केली.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन घेतले; परंतु तो मातीमोल भावाने विक्री केला जात असून, शेतकरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शासनाने दीड हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा तसेच कांद्याची २० लाख टन इतकी निर्यात करावी, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी वेगळा फंड निर्माण करून दिला जावा. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय जाधव, निवृत्ती न्याहारकर, श्याम गोसावी, देवीदास पोरजे, मीराताई भोईर, सुपडू जाधव, भगवान खरे, उत्तमराव गायकर, रावसाहेब थेटे, मयूर गऊळ, गोपीनाथ लामखेडे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना कांदा भेट देताना जय किसान फोरमचे पदाधिकारी.