कांदा गडगडला; शेतकºयांमध्ये नैराश्य आवक वाढली : तेराशेपर्यंत भाव खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:11 AM2017-09-11T01:11:11+5:302017-09-11T01:11:25+5:30
महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली असून, नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी पुन्हा एकदा नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत.
नाशिक : महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली असून, नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी पुन्हा एकदा नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत. जिल्ह्याच्या बाजार समित्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून वाढलेली आवक हेच कारण भाव गडगडण्यामागे असले तरी, पाच महिन्यांपासून साठवून ठेवलेल्या कांद्याच्या ढासळत चाललेल्या गुणवत्तेचाही त्यावर परिणाम झाला आहे.
सध्या प्रतिक्विंटल रुपये १२०० ते १५०० इतक्या खालपर्यंत कांद्याचे भाव आले आहेत. त्यामुळे शेतकºयांकडून कमी भावाने खरेदी करून त्याची साठवणूक व्यापाºयांकडून करून ठेवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने परिस्थितीवर शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. कांदा पिकविणाºया राज्यांमध्ये यंदा अतिवृष्टीने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणावर कांद्याचे नुकसान झाले, परिणामी देशांतर्गत कांद्याची मागणी वाढली. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत भाव गडगडल्यामुळे शेतकºयांनी कांदा चाळीतच साठवून ठेवला. शेतकºयांनी त्यावेळी घेतलेला व्यवहारी निर्णय मात्र त्यांचा फायदा करून गेला. जुलै महिन्यात कांद्याची चणचण भासू लागल्यानंतर शेतकºयांनी साठवलेला कांदा बाहेर काढला परिणामी त्याला चांगला भाव मिळाला. कांद्याची प्रमाणात आवक झाल्यामुळे व्यापाºयांनीही त्याला भाव दिला. तथापि, कांद्याचा बाजार तेजीत आला म्हटल्यावर शेतकºयांनी बाजारात धाव घेतली व नेमक्या बाजारातील सूत्र बिघडल्याने कांदा गेल्या आठवड्यापासून जितक्या झपाट्याने वर गेला तितकाच खाली कोसळण्यास सुरुवात झाली. कांद्याच्या तेजीवर सणासुदीचा आनंद द्विगुणीत करण्याच्या तयारीत असलेले शेतकरी नैराश्येत सापडले.
ग्राहकांना फायदा नाहीच
बाजार समितीत कांदा गडगडून निम्म्यावर आला असला तरी, त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत नाही. आजही कांदा बाजारात ३० ते ३५ रुपये इतका भाव असून, दुसरीकडे कांदा पिकविणाºया शेतकºयाला मात्र या बाजारातील भाववाढीचा काहीच लाभ होत नाही.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढल्याच्या वृत्तामुळे केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारभाव कमी करण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला व इजिप्तहून काही प्रमाणात कांद्याची आयातही झाली. त्यामुळे भविष्यात कांद्याला भाव मिळणार नाही अशा अनामिक भीतीपोटी जिल्ह्यातील शेतकºयांनी साठवलेला कांदा बाहेर काढला. प्रचंड आवक झाल्यामुळे कांद्याला १२०० ते १७०० इतकाच भाव मिळाला, त्यातही कांद्याचा दर्जा पाहून व्यापाºयांनी भाव ठरविण्यास सुरुवात केली आहे.