चाळीत साठविलेला कांदा सडू लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 01:10 AM2018-09-01T01:10:06+5:302018-09-01T01:10:35+5:30
आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कांद्याला १३०० रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. आॅगस्ट मध्यानंतर मात्र भावात घसरण होऊन ८०० रुपयांपर्यंत आला. शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात चाळीत साठविलेला कांदा आता सडू लागल्याने मिळेल त्या भावात कांदा विकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माळवाडी : आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कांद्याला १३०० रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. आॅगस्ट मध्यानंतर मात्र भावात घसरण होऊन ८०० रुपयांपर्यंत आला. शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात चाळीत साठविलेला कांदा आता सडू लागल्याने मिळेल त्या भावात कांदा विकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चांगला भाव मिळेल, या उद्देशाने अनेक शेतकºयांनी मार्च महिन्यापासून कांदा चाळीत साठवला होता. कांदा चाळीत साठवलेला असल्याने खरिपासाठी कर्ज घेऊन शेतकºयांनी शेतीसाठी भांडवल उभे केले.
कांदा भाववाढीची शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कांदा भावात घसरण सुरूच असल्याने शेतकरी चिंतित आहेत. १५ आॅगस्टच्या आधी सरासरी ११६० रूपये प्रति क्विंटलने विकला जाणारा उन्हाळ कांदा आज सरासरी ७८० रूपये प्रति क्विंटल या भावाने विकला जात आहे. कांद्याला चार पैसे तर मिळालेच नाहीत नाही; पण आता चाळीतील कांदा पूर्णत: पोकळ होऊ लागला आहे. काही ठिकाणी सडू लागला आहे. कांदा भाव ८५० ते ९५० रूपयांपेक्षा जास्त नसल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवा कांदा अजून बाजारात दाखल न झाल्याने चाळीत कांदा ठेवावा की विकावा, चाळीत कांदा सडला तर काय करायचे, असे प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाले आहेत. कांदा भावात सरासरी ५०० ते ६०० रूपये घसरणीचा फटका बसत असला तरी चाळीतील कांदा सडणे व वजन घटू लागल्याने आता कांदा विक्रीला काढण्याशिवाय शेतकºयांपुढे पर्याय नाही.