कांद्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:27 AM2020-12-03T04:27:08+5:302020-12-03T04:27:08+5:30

बाजारात लिंबूची मागणी कायम नाशिक : कोरोनाच्या काळात लिंबूला वाढलेली मागणी अजूनही कायम आहे. वातावरणात गारवा वाढला असला तरी ...

Onions bring some relief to consumers | कांद्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा

कांद्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा

googlenewsNext

बाजारात लिंबूची मागणी कायम

नाशिक : कोरोनाच्या काळात लिंबूला वाढलेली मागणी अजूनही कायम आहे. वातावरणात गारवा वाढला असला तरी ग्राहकांकडून अजूनही लिंबूची खरेदी केली जात आहे. कोरोनाच्या प्रभावकाळात लिंबूचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले होते. थंडीत वाढ होत असताना लिंबूला असलेली मागणी अजूनही कायम आहे.

व्यावसायिक इमारतींना वाहनांचा वेढा

नाशिक: शहरात पार्किंगचा मोठा प्रश्न असून, व्यावसायिक इमारतींना चारचाकी, दुचाकी वाहनांचा वेढा पडलेला दिसतो. वास्तविक नव्या इमारतींना वाहनतळ करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.अनेक इमारतींच्या तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था करण्यातदेखील आली आहे. मात्र या वाहनतळाचा वापर न होता इमारतीच्या चारही बाजू वाहनांनी कोंडले जात आहेत.

झोपडपट्टीत पाण्याचा अपव्यय

नाशिक : शहरातील अनेक भागात झोपडपट्ट्यांमध्ये पाण्याचे अनधिकृत कनेक्शन घेण्यात आलेले आहे. अशा ठिकाणी नळांना तोट्या नसल्याने तसेच नादुरुस्त असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होताना दिसतो. झेापडपट्ट्यांमध्ये अशा बेकायदेशीर जोडण्या असल्याने महापालिकेकडूनदेखील कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते. स्थानिक नागरिकदेखील पालिका कर्मचाऱ्यांना विरोध करीत असतात.

Web Title: Onions bring some relief to consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.