कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 02:29 PM2018-11-29T14:29:16+5:302018-11-29T14:29:25+5:30
खमताणे : कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.पाण्याची टंचाई , महागाई, भारनियमन, पिकांवर ...
खमताणे : कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.पाण्याची टंचाई , महागाई, भारनियमन, पिकांवर रोग याचा सामना करीत घेतलेल्या कांद्याला अल्प दर मिळत असल्याने असल्याने उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. यावर्षी कांदा बियाणांंचे भाव गगनाला भिडले होते.दोन ते तीन हजार ररूपये किलो बियाण्यांचा दर होता.सटाणा तालुक्यात रब्बी आणि उन्हाळी १५ हजार हेक्टरमध्ये शेतक-यांनी कांद्याची लागवड केली आहे. उन्हाळी कांद्याला सरासरी ४०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.गत आठवड्यातुन बाजारभावाच्या तुलनेत प्रतिक्विंटल ३०० ररूपये घसरण झाली.त्यामुळे शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बाजारभाव तेजीत येतील या आशेने शेतकर्यांची उन्हाळा कांदा साठवुण ठेवला होता.आवक कमी असतानाही बाजारभाव कमी झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कांद्याची साठवणुक कालावधी संपला असुन, प्रतवारी खराब होताना दिसत आहे.लाल कांद्याची आवक राज्यासह गुजरात ,राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांतुन मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याने भावात घसरण होत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
----------------------
शेतक-यांना एकरी ७० ते ८० हजार रूपये खर्च झालेला आहे.परंतु कांदा कवडीमोल असल्यामुळे शेतक-यांचा खर्चही भरु न निघत नाही.
- वैभव बागुल ,युवा शेतकरी, खमताणे