कांदा पाच हजारांच्या पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 01:15 AM2019-09-20T01:15:38+5:302019-09-20T01:17:48+5:30
बाजार समिती आवारावर कांद्याची आवक कमी होत असून, देशांतर्गत मागणी वाढलेली असल्यामुळे गेल्या सप्ताहापासून वाढत असलेले कांद्याचे दर गुरुवारीही वाढते राहिले. लासलगाव आणि वणीमध्ये कांदा दराने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
नाशिक : बाजार समिती आवारावर कांद्याची आवक कमी होत असून, देशांतर्गत मागणी वाढलेली असल्यामुळे गेल्या सप्ताहापासून वाढत असलेले कांद्याचे दर गुरुवारीही वाढते राहिले. लासलगाव आणि वणीमध्ये कांदा दराने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
वणी उपबाजारात गुरुवारी ५१११ रु पये प्रतिक्विंटल अशा विक्र मी दराने व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केला. बाजार समितीत ३०८ वाहनांमधून ७००० किलो कांदा विक्र ीसाठी आला होता. त्याला ५१११ रु पये कमाल ३८०० रु पये किमान, तर सरासरी ४४०० रु पये प्रतिक्विंटलचे दर मिळाले.
आठवड्यापासून कांद्याच्या दरात होणारी वाढ उत्पादकांची कळी खुलविणारी असून, लाखो रु पयांची उलाढाल प्रतिदिनी होत आहे. केंद्र शासनाने काही दिवसांपूर्वी कांदा आयातीबाबत निर्णय घेतला होता. त्याबाबत उत्पादकांमध्ये नाराजीचे वातावरण होते; मात्र देशांतर्गत मागणी वाढल्याने कांदा पुरवठ्याला मर्यादा पडू लागल्याने बाजारात तेजीचे वातावरण आहे.
पिंपळगावला कांद्याला ४८०० रुपयांचा भाव
पिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीत कांद्याच्या भावाने उच्चांकी धडक गाठली असून, कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे कृषिमालाचे मोठे नुकसान झाले. त्यातून जो कांदा वाचला, त्याची विशेष काळजी उत्पादकांनी घेतल्याने त्याचा फायदा होताना दिसत आहे. सध्या कांद्याची आवक कमी झाली असून दर वधारले आहेत.
गुरु वारी १५,२०० क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला कमीत कमी रु. २५०० सरासरी रु. ४४५१ तर जास्तीत जास्त ४८०० रु पयांचा भाव मिळाला. बुधवारच्या तुलनेने कांद्याचे भाव ९०० रु पयांनी तेजीत राहिले.
कळवण, देवळा, सटाणा, वडाळी, धोडंबे व निफाड तालुक्यातील गावातून आणि परिसरातून कांदा विक्रीसाठी येत आहे. सध्याची कांद्याची स्थिती पाहता हे दर वाढतच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.