बांगलादेशसह अन्य प्रांतात ५५ रॅकमधून कांदा रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:53+5:302021-06-09T04:16:53+5:30

नाशिक जिल्ह्यातून वेगवेगळ्या कांदा व्यापाऱ्यांचा माल कसबे सुकेणे रेल्वेस्थानकावर जमा होऊन तो रवाना करण्यात आला. सध्या कांदा पिकाला ...

Onions shipped in 55 racks to other provinces including Bangladesh | बांगलादेशसह अन्य प्रांतात ५५ रॅकमधून कांदा रवाना

बांगलादेशसह अन्य प्रांतात ५५ रॅकमधून कांदा रवाना

googlenewsNext

नाशिक जिल्ह्यातून वेगवेगळ्या कांदा व्यापाऱ्यांचा माल कसबे सुकेणे रेल्वेस्थानकावर जमा होऊन तो रवाना करण्यात आला. सध्या कांदा पिकाला चांगला भाव मिळत असून चांगला कांदा सरासरी १८०० ते २१०० रुपयेपर्यंत विकला जात आहे. देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशामध्ये देखील भारतीय कांद्याला मोठी मागणी आहे. चालूवर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दोन वर्षापासून पावसाने शेतकऱ्यांना तारल्यामुळे भूजल साठा मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे शेतकरी हक्काचे व्यापारी पीक म्हणून कांदा या पिकाकडे बघू लागले आहेत. शिवाय कांदा उत्पादनास नाशिक जिल्ह्यातील हवामान पोषक असल्याने कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. मागीलवर्षी देखील कांद्याला चांगला भाव मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पर्यायाने यावर्षी देखील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली.

इन्फो

कसबे सुकेणे मध्यवर्ती ठिकाण

कसबे सुकेणे रेल्वेस्थानक हे लासलगाव, पिंपळगाव, विंचूर, निफाड व सायखेडा या बाजारपेठांना मध्यवर्ती असल्याने व्यापाऱ्यांच्या सोयीनुसार व रोड कनेक्टिविटीमुळे मध्य रेल्वे प्रशासनाने कसबे सुकेणे मालधक्क्याच्या विकासाचे नियोजन केले असल्याचे समजते. तीन नंबर फलाटावरून सध्या कांदा रॅक उभी करून बांगलादेश व देशभरात या ठिकाणाहून कांदा पाठविला जात आहे.

फोटो- ०७ ओनियन रेल्वे

===Photopath===

070621\07nsk_47_07062021_13.jpg

===Caption===

फोटो- ०७ ओनियन रेल्वे 

Web Title: Onions shipped in 55 racks to other provinces including Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.