येवल्यातील कांदा व्यापाऱ्याची ६ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:34+5:302021-03-14T04:14:34+5:30
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला येथील कांदा व्यापारी सुमीत सुभाष समदडीया यांच्या अमोल ट्रेडिंग कंपनीचा एकूण ५२९ गोणीतील सुमारे ...
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला येथील कांदा व्यापारी सुमीत सुभाष समदडीया यांच्या अमोल ट्रेडिंग कंपनीचा एकूण ५२९ गोणीतील सुमारे ६ लाख ३२ हजार ४६ रुपये किमतीचा कांदा संशयितांनी परस्पर विकला. संशयितांनी इतर व्यक्तींचे नावावर असलेले सिमकार्ड व फोन वापरून तसेच ट्रान्सपोर्ट मालक यांना फोन करून ट्रकला बनावट नंबर प्लेट लावली. कांदा व्यापारी समदडीया यांचा कांदा ओडिसा (कोयकाबाजार) येथील चंदनेश्वर एन्टरप्रायजेस येथे पोहोच करण्यासाठी विश्वासाने त्यांना गाडीत भरून दिला असता कांदा ओडिसा येथे पोहोच न करता परस्पर अन्यत्र विक्री करून फसवणूक केली. या प्रकरणी समदडीया यांच्या फिर्यादीवरून संशयित प्रवीण एकनाथ अहिरे (रा. श्रीरामनगर, नाशिक), सादिक युसुफ पटेल (रा. संजयनगर, पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे), पंकज उर्फ बंदी शिंदे (रा. आडगाव जि. नाशिक) यांचेसह पिंपळनेर (ता. साक्री) येथील इतर तिघांविरूध्द गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये दोघा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.