सटाणा इनरव्हील क्लबतर्फे मुलांसाठी ऑनलाइन उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:11 AM2021-06-03T04:11:03+5:302021-06-03T04:11:03+5:30
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ओझर येथील असिस्टंट टाऊन प्लॅनर राजश्री दुसाने यांना आमंत्रित केले होते. प्रास्ताविक क्लबच्या ...
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ओझर येथील असिस्टंट टाऊन प्लॅनर राजश्री दुसाने यांना आमंत्रित केले होते. प्रास्ताविक क्लबच्या अध्यक्ष रूपाली जाधव यांनी केले. परिचय सुवर्णा देवपूरकर यांनी करून दिला. पाच दिवसांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना वेगवेगळे उपक्रम देण्यात आले. पहिल्या दिवशी त्यांची ओळख व छंद जाणून घेतले. उपक्रमाअंतर्गत प्रत्येकाला एक ग्रीटिंग कार्ड आणि एक पत्र लेखन करण्यास सांगितले. तिसऱ्या व चौथ्या दिवशी भाषण करण्यास सांगितले. समारोपाच्या दिवशी विद्यार्थ्यांना समाजातील न आवडणारी गोष्ट याविषयी तीन मिनिटांचे भाषण करण्यास सांगितले. दुसाने यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत मार्गदर्शन केले.
ऑनलाइन कार्यक्रमांमध्ये ५० लोकांची उपस्थिती होती. त्यात क्लबच्या संस्थापक अध्यक्ष रूपाली कोठावदे, माजी अध्यक्षा स्मिता येवला, रूपाली निकुंभ, विद्या अमृतकर, मीनाक्षी जाधव, कल्पना जाधव, पुष्पा जाधव आदींचा समावेश होता. हेमलता विसपुते यांनी आभार मानले. सहभागी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात आले.