बारावीसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 09:53 PM2020-06-11T21:53:02+5:302020-06-12T00:30:48+5:30

नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लाकॅ डाऊन लागू केल्यानंतर राज्य सरकारनेही या निर्णयाची अंमलबजावणी केल्याने सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद असून, अशा स्थितीत विद्यार्थ्यांना पुढील वर्षाचे प्रवेश घेण्यासह कोणत्याही शैक्षणिक कामासाठी बाहेर पडणे शक्य नाही.

Online admission process for XII | बारावीसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया

बारावीसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया

Next

नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लाकॅ डाऊन लागू केल्यानंतर राज्य सरकारनेही या निर्णयाची अंमलबजावणी केल्याने सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद असून, अशा स्थितीत विद्यार्थ्यांना पुढील वर्षाचे प्रवेश घेण्यासह कोणत्याही शैक्षणिक कामासाठी बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिकमधील विविध महाविद्यालयांनी बारावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे.
कोरोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर देशभरात २३ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील मंडळ अथवा केंद्र स्तरावरील परीक्षा व निकालप्रक्रिया पूर्णपणे थांबविण्यात आली असून, पहिली ते आठवी आणि नववी व अकरावीचे निकालही विद्यार्थ्यांच्या वार्षिक सरासरी गुणांच्या आधारे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे हे निकालही शाळा महाविद्यालयांनी आॅनलाइन पद्धतीने संस्थेच्या संकेतस्थाळावर प्रकाशित करून अथवा फोन, ई-मेल, एसएमएस व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमांतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले. परंतु, आता नवीन शैक्षणिक वर्ष तोंडावर येऊन ठेपले असतानाही शाळा महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शहरातील विविध शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांनी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्याची तयारी केली आहे. यात प्रामुख्याने बारावीच्या प्रवेशप्रक्रियेवर शैक्षणिक संस्थांचा भर असून, संस्थांच्या संकेतस्थळावरून आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.
---------------------
गोखले एज्युकेशन संस्थेच्या शहरी भागातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या प्रवेशप्रक्रिया दि. १० ते ३० जून २०२० या कालावधीत सकाळी १० वाजल्यापासून सर्व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. संस्थेच्या बी.वाय.के, एसएमआरके, एचपीटी व आरवायके महाविद्यालयांसह नाशिकरोड महाविद्यालय, डॉ. एम. एस. गोसावी कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज व एच.एल. कॉलेज, ओझर या महाविद्यालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार असणार आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात न येता प्रवेश घेता येण्यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे.
- डॉ . मो. स. गोसावी, सचिव, गोखले एज्युकेशन सोसायटी

Web Title: Online admission process for XII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक