शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइन अर्ज

By admin | Published: November 23, 2015 10:55 PM2015-11-23T22:55:20+5:302015-11-23T22:55:44+5:30

तांत्रिक दोषांकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष

Online application for scholarship | शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइन अर्ज

शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइन अर्ज

Next

नाशिक : राज्यातील विविध महाविद्यालयांतील अभ्यासक्रमाच्या फक्त प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क मिळण्यासाठी आॅनलाइन अर्ज तत्काळ भरण्याचे आवाहन मुंबई उपनगर समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी केले आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. मात्र अर्ज दाखल करण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्याकडे समाज कल्याण विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क देण्यात येते. त्यासाठी प्रत्येक वर्षी आॅनलाइन अर्ज करावे लागत होते. परंतु सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून केवळ प्रथम वर्षाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाच आॅनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Online application for scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.