१२५० प्रस्तावांना आॅनलाइन मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 10:34 PM2019-12-06T22:34:42+5:302019-12-07T00:33:17+5:30
नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी मिळूनदेखील या शिक्षकांचे पगार आॅफलाइनच दिले जात होते. या आॅफलाइन प्रक्रियेमुळे पगारास विलंब होत होता. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांच्याकडे मागणी केली होती. यात या चार जिल्ह्यातील शिक्षकांच्या १२५० प्रस्तावास आॅनलाइन करण्यासाठी नितीन बच्छाव यांनी मान्यता देऊन हा प्रश्न मार्गी लावल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सिन्नर : नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी मिळूनदेखील या शिक्षकांचे पगार आॅफलाइनच दिले जात होते. या आॅफलाइन प्रक्रियेमुळे पगारास विलंब होत होता. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांच्याकडे मागणी केली होती. यात या चार जिल्ह्यातील शिक्षकांच्या १२५० प्रस्तावास आॅनलाइन करण्यासाठी नितीन बच्छाव यांनी मान्यता देऊन हा प्रश्न मार्गी लावल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यात उच्च माध्यमिकचे प्रस्ताव पुणे येथील परीक्षा आयुक्त तुकाराम सुपे यांनी, शालार्थ आयडी दिलेले प्रस्ताव विभागीय अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी तर शालार्थ आयडी दिलेले प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव बी.के. दहीफळे यांनी मंजूर केलेले शालार्थ आयडी प्रस्ताव शिक्षणाधिकारी नितीन उपासनी व नवनाथ औताडे यांनी मान्यता दिलेल्या प्रस्तावांना शिक्षण उपसंचालक म्हणून नितीन बच्छाव यांनी दिलेले शालार्थ आयडी अशा सर्व विभागातील १२५० शालार्थ आयडी आॅफलाइन होते. हे सर्व शालार्थ आयडी आता आॅनलाइन झाले असून, नाशिक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आनंद व्यक्त करीत आहे. हे सर्व मुख्याध्यापक संघाच्या प्रयत्नाचे यश असल्याचे एस. बी. देशमुख यांनी सांगितले.
मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेवर आॅनलाइन शालार्थ आयडी अपडेट करून आॅनलाइन पगार बिले काढण्याच्या सूचना नितीन बच्छाव यांनी दिल्या. तसेच प्लॅन व नॉन प्लॅन पगार बिले नॉन प्लॅनमध्ये आणण्याचे काम सध्या सुरू आहे. जानेवारी अखेरपर्यंत सर्व पगार बिले नॉन प्लॅनमध्ये येऊन सर्वच कर्मचाऱ्यांची पगार बिले एकाच वेळेस १ तारखेलाच देण्याचे आश्वासन नितीन बच्छाव यांनी मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाºयांना दिले.
२० टक्के अनुदानासाठी पात्र व अपात्र सर्वच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्रस्ताव पुणे येथे शिक्षण संचालकांकडे पाठविले असून, २० टक्के व पुढील टप्पा अनुदानासाठी मुख्याध्यापक संघाने संचालक व आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मुख्याध्यापक संघ आक्रमक असल्याचेही मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाठ, सचिव एस. बी. देशमुख, सुरेश शेलार यांनी सांगितले.