आंबेडकर जयंतीनिमित्त परिवर्ततर्फे ऑनलाइन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:14 AM2021-04-13T04:14:17+5:302021-04-13T04:14:17+5:30

परिवर्तच्यावतीने गीत लेखन, गायन, निबंध लेखन आणि रांगोळी आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, गीत लेखन स्पर्धा सर्वांसाठी खुली ...

Online competition by Parivartan on the occasion of Ambedkar Jayanti | आंबेडकर जयंतीनिमित्त परिवर्ततर्फे ऑनलाइन स्पर्धा

आंबेडकर जयंतीनिमित्त परिवर्ततर्फे ऑनलाइन स्पर्धा

Next

परिवर्तच्यावतीने गीत लेखन, गायन, निबंध लेखन आणि रांगोळी आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, गीत लेखन स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विषयाचे बंधन नाही, पण गीत शक्यतो आंबेडकरी, पुरोगामी, सामाजिक जाणिवेचे असावे. गझल, भावगीत, कोणत्याही फॉर्ममध्ये चालेल. गीत मराठी, हिंदी भाषेत असेल तरी स्वीकारले जाईल. दि. १४ एप्रिलपर्यंत परिवर्त कार्यकारिणीचे रोहित गांगुर्डे यांच्या

व्हाॅट‌्सॲप नंबरवर टाईप करून पाठवावे. या स्पर्धेसाठी प्रथम ५००, द्वितीय ३००. तृतीय २०० रुपये याप्रमाणे पारितोषिके देण्यात येणार आहे.

.गीत गायन स्पर्धा - स्पर्धकांनी मराठी, हिंदी भाषेत गीत गायन करायचे आहे. गीत सामाजिक अथवा बाबासाहेबांच्या विचारांनी प्रभावित असावे.

गीत स्वरचित अथवा कोणत्याही कवीचे असो, ते स्वीकारले जाणार आहे.

स्पर्धकांनी आपल्या गीत गायनाचा २,३ मिनिटांपेक्षा मोठा व्हिडिओ नसावा. परिवर्त कार्यकारिणीचे किशोर शिंदे यांच्या व्हाॅट‌्स ॲप नंबरवर दि. १४ एप्रिलपर्यंत व्हिडिओ पाठविणे आवश्यक आहे.

निबंध स्पर्धा - ही स्पर्धा दोन गटात असेल, शालेय गट

निबंधाची शब्द मर्यादा ३०० ते ४०० शब्दांची असेल.

मोठा किंवा खुला गट या गटासाठी निबंधाची शब्द मर्यादा ४०० ते १००० शब्द इतकी असेल. निबंध स्वलिखित/ टाईप केलेले असावेत. निबंध प्रा. गंगाधर आहिरे यांच्या पत्यावर पाठवावेत रांगोळी स्पर्धा- आपापल्या घराच्या दारासमोर काढावी. - रांगोळी काढतांनाचा एक फोटो व पूर्ण झाल्यानंतरचा एक फोटो असे दोन फोटो स्पर्धा संयोजक वैशाली रणदिवे यांच्या नंबरवर दि. १४ एप्रिल २०२१ रोजी, सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाठवावे. प्रत्येक स्पर्धेसाठी दोन परीक्षक असतील. - परीक्षकांचा निर्णय अंतीम राहिल. परिवर्त परिवाराच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विविध स्पर्धांबरोबरच ऑनलाइन व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि.१३ एप्रिल रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी 'कथा रूपातील बाबासाहेब' या विषयावर किशोर शिंदे यांचे तर बुधवार दि. १४ एप्रिल रोजी 'डॉ. आंबेडकर आणि कामगार कायदे' या विषयावर शहरातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डाॅ. संजय जाधव यांचे व्याख्यान होईल. दोन्ही व्याख्याने ऑनलाइन पद्धतीने 'झूम' ॲपवर सायंकाळी ठीक सहा वाजता होतील. या विविध स्पर्धा व व्याख्यान कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोरोना काळातही घरबसल्या डाॅ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्याचे आवाहन परिवर्त परिवाराचे अध्यक्ष प्रा. गंगाधर अहिरे, सचिव दिनकर पवार, प्रा धीरज झाल्टे, अशोक मोरे आदींनी केले आहे.

Web Title: Online competition by Parivartan on the occasion of Ambedkar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.