३३ लाख उताऱ्यांचे ऑनलाईन वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:15 AM2021-03-25T04:15:51+5:302021-03-25T04:15:51+5:30

नाशिक: जमिनीसंदर्भातील व्यवहरासाठी लागणारी माहिती आता ऑनलाईन उपलब्ध झाल्याने नाशिक जिल्ह्यात ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सुमारे ३३ लाख नागरिकांनी ...

Online distribution of 33 lakh copies | ३३ लाख उताऱ्यांचे ऑनलाईन वितरण

३३ लाख उताऱ्यांचे ऑनलाईन वितरण

Next

नाशिक: जमिनीसंदर्भातील व्यवहरासाठी लागणारी माहिती आता ऑनलाईन उपलब्ध झाल्याने नाशिक जिल्ह्यात ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सुमारे ३३ लाख नागरिकांनी उतारे ऑनलाईन मिळविले आहे. २०१३ पासूनचे अभिलेख आता संगणकीकृत उपलब्ध असल्याने नागरिकांना जमिनीची माहिती मिळविणे सोपे झाले आहे. जिल्ह्यात ऑनलाईनच्या माध्यमातून उतारे मिळविण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे.

जमिनीसंदर्भातील माहिती खासगी तसेच शासकीय कामासाठी अनेकदा महत्वाची ठरत असते. जमिनीच्या मूळ मालकापासून तर त्यात वेळोवेळी होत गेेेलेल्या बदलांंच्या नेांदी आता सहज उपलब्ध होत असून त्यासाठी आता तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत. जमिनीचे सातबारा, फेरफार,खाते उतारे यांची माहिती भूमी अभिलेख आणि तहसील कार्यालयात उपलब्ध‌् होती ती आता ऑनलाईन उपलब्ध झाल्याने यंत्रणेवरील ताण देखील कमी झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात जवळपास ३३,३५,२६६ इतके उतारे ऑनलाईन वितरीत झाले आहेत. संबंधितांनी ऑनलाईच्या माध्यमातून उतारे प्राप्त करवून घेतले आहेत. ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे शासनाने जूने अभिलेख उतारे उपलब्ध करून दिले आहेत. जमिनी संदर्भातील कोणतेही व्यवहार करतांना जमिनीची माहिती महत्वाची ठरते. त्यावरच पुढील व्यवहार अवलंबून असते. त्यामुळे सातपारा, आठ-अ तसेच फेरफार उताऱ्यांची अद्ययावत माहिती ऑनलाईन उपलब्ध झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २१,२२,१५५ इतके सातबारा उतारे, ९,०३,६०४ आठ-अ तर ३,०९,५०७ इतके फेरफार उतारे नाशिकमधील नागरिकांनी ऑनलाईन उपलब्ध करवून घेतले आहे. जमिन खरेदी,विक्रीच्या व्यवहारासाठी उतारे महत्वाचे असल्याने दररोज हजारेा लोक ऑनलाईन माध्यमाला भेट देत असतात तर प्रत्यक्षात उतारे काढणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.

--इन्फेा--

नागरिकांसाठी दस्तऐवज वितरण

तालुका सातबारा आठ अ फेरफार एकुण

नाशिक २८६७८६ ३१२८५ ९६७२७ ४१४७९८

सुरगाणा ४६२१२ ३७८८२ १३७८ ८५४७२

त्र्यंबक ५१०३१ १४८६४ ६८७४ ७२७६९

इगतपुरी ३७२५७ ७२९३ १६६६२ ६१२१२

सिन्नर २३५१०८ १०२६१९ ३०१५३ ३६७८८०

निफाड २१३९८७ ८३०७५ ३१४४८ ३२८५१०

येवला ९३३३० ९३०५६ १०६६९ १५७०५५

कळवण ५६२६६ ३१७४१ ९३५१ ९७३५८

देवळा ११९६६७ ४२५१४ ६०८५ १६८२६६

बागलाण १८१०२४ ९३०८४ १२३९८ २८६५०६

मालेगाव ३२३२०० १५८२७८ ३१११२ ५१२५९०

नांदगाव ५३९३६ ३१९७२ १२५५१ ९८४५९

चांदवड १७१०८८ ७४५२६ १८२३८ २६३८५२

दिंडोरी २०००६९ ९६५३६ २३८९५ ३२०५००

पेठ ५३१९४ ४४८७९ १९६६ १०००३९

एकुण २१२२१५५ ९०३६०४ ३०९५०७ ३३३५२६६

Web Title: Online distribution of 33 lakh copies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.