महापालिकेच्या शाळेतही आॅनलाईन शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 04:14 PM2020-04-22T16:14:59+5:302020-04-22T16:17:10+5:30
नाशिक- सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे शाळांना सुट्या आहेत. मात्र, त्यानंतरही जवळपास सर्वच खासगी शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाईलव्दारे शिक्षण देत आहेत. मात्र, महापालिकेच्या आनंदवली येथील शाळेतील शिक्षीका सविता बोरसे पाचवीच्या मुलांचा नियमीत अभ्यास आणि नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचा सरावही आॅनलाईनच करून घेत आहेत. अनेक शिक्षक अशाप्रकारचे प्रयोग करण्यासाठी प्रयत्न तर करीत आहेतच परंतु शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक मनपा शाळांनी आॅनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत.

नाशिक महापालिकेच्या ९० शाळा आहेत. त्यात सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. ही संख्या वाढविण्यासाठी महापालिकेकडून ई लर्निंगसह अनेक साधनांचा वापर केला जात आहे. बाभळेवाडी शाळा पॅटर्न राबवण्यासाठी मध्यंतरी चाळीस शिक्षक प्रत्यक्ष अनुभव घेऊन आल्यानंतर त्यांनी देखील प्रयोगशीलता दाखविण्यास सुरूवात केली आहे. त्यातच सध्या लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे मनपाच्या सर्व शाळा बंद आहेत. खासगी शाळा बंद असल्या तरी मोबाईल आणि विविध लिंक्सव्दारे शिक्षण दिले जात आहे. तसे महापालिकेत देण्याचे प्रयत्न होत आहेत. आनंदवल्लीतील शिक्षीका सविता बोरसे यांनी पाचवीतील सव्वाशे मुलांचा अभ्यास बुडू नये यासाठी पालकांच्या मोबाईल क्रमांक घेऊन वॉटस अॅप गु्रप तयार केले आहेत. त्यावर प्रश्नावली टाकून मुलांकडून ती भरून घेतली जात आहे. त्यामुळे मुलांचा अभ्यास सुट्टीतही सुरूच आहे. मुलांना नियमीत प्रश्नावली पाठविल्यानंतर त्यांना काही शंका असल्यास त्याचेही निरसन केले जात आहे.
याशिवाय काही शिक्षक व्हीडीओ तयार करण्याचा प्रयत्न आहेत. तर काही जण व्हीडीआ कॉलींग व्दारे देखील शंका निरसन करीत आहेत. याशिवाय आता लवकरच प्रवेश सुरू होणार असल्याने अनेक शिक्षकांनी मनपा शाळेत प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज पाठवून ते भरून घेण्यास सुरूवात केली आहे.