पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण ; खासगी शाळांचा व्यावसायिक दृष्टीकोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 03:13 PM2020-06-09T15:13:12+5:302020-06-09T15:15:16+5:30

खासगी शाळांनी व्यावसायिक दृष्टीकोन आत्मसात करीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. यात पूर्व प्राथमिक शाळाही मागे नसून नर्सरी सोबतच ज्युनीयर केजी व सिनीयर केजीचे वर्ग चालविणाऱ्या खासगी शाळांनीही ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. 

Online education for pre-primary students as well; Professional approach of private schools | पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण ; खासगी शाळांचा व्यावसायिक दृष्टीकोन

पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण ; खासगी शाळांचा व्यावसायिक दृष्टीकोन

Next
ठळक मुद्देखासगी शाळांचा व्यावसायिक दृष्टीकोन नर्सरीच्या विद्यार्थ्यांनाही ऑऩलाईन शिक्षण विद्यार्थी वाढविण्यासाठी शाळांमध्ये स्पर्धा

नाशिक : देशभरातील शाळा महाविद्यालये ऑगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी अनेक खासगी शाळांनी व्यावसायिक दृष्टीकोन आत्मसात करीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. यात पूर्व प्राथमिक शाळाही मागे नसून नर्सरी सोबतच ज्युनीयर केजी व सिनीयर केजीचे वर्ग चालविणाऱ्या खासगी शाळांनीही ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. 
पूर्व प्राथमिक शाळांनी गेल्या वर्षी पालकांसोबत संवाद साधण्यासाठी तयार केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपच्या माध्यमातून झूम, गुगल मीट सारख्या अ‍ॅपच्या लिंग शेअर करून विद्यार्थ्यांच्या नवीन वर्षांचे वर्ग आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.अशा प्रकारे विद्यार्थ्यांसोबत मोबाईच्या माध्यमातून संवाद साधत शाळेतील शिक्षक मागील वर्षात विद्यार्थ्यांना शिकविलेल्या अभ्यासक्रमासह विविध प्रकारच्या कार्यनुभावंच्या प्रात्यक्षिकांची उजळणीही करून घेत आहेत. त्यासाठी पालकांना पूर्व सूचना दिली जात असून पालकांना विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यास सांगितले जात आहे. अशाप्रकारे ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा वापर करीत शाळेपासून विद्यार्थी दूर होऊन दुसऱ्या शाळेत प्रवेश घेऊन नये यासाठी शाळांकडून व्यावसायिक दृष्टीकोन जपला जात आहे. पूर्व प्राथमिक शाळांना सरकारी अनुदान अथवा कोणतीही मदत मिळत नसल्याने या शाळांचे आर्थिक नियोजन विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या शुल्कावरच अवलंबून असल्याने जितके अधिक विद्यार्थी तेवढेच अधिक उत्पन्न असे या शाळांचे समीकरण बनले आहे. त्यामुळे अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पट वाढविण्याची स्पर्धा निर्माण झाली असून या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पूर्व प्राथमिक शाळांनाही आॅनलाईन शिक्षणासारखा व्यावसायिक दृष्टीकोन आत्मसात करावा लागतो आहे. परंतु, अशाप्रकारे ऑनलाईन शिक्षण प्रणालीतून शाळा त्यांचा व्यावसायिक दृष्टीकोन जपत असल्या तरी विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम  पालकांनाच पूर्ण करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

Web Title: Online education for pre-primary students as well; Professional approach of private schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.