पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण ; शुल्क वसुलीसाठी शाळांचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 06:49 PM2020-07-09T18:49:44+5:302020-07-09T18:59:07+5:30

देशभरातील शाळा महाविद्यालये ऑगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी अनेक खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून वगळावे अशा स्पष्ट शुचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. परंतु, तरही अगदी नर्सरी सोबतच ज्युनियर केजी व सिनियर केजीचे वर्ग चालविणाऱ्या खासगी शाळांनीही ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे

Online education for pre-primary students as well; School ferry for fee recovery | पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण ; शुल्क वसुलीसाठी शाळांचा घाट

पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण ; शुल्क वसुलीसाठी शाळांचा घाट

googlenewsNext
ठळक मुद्देपूर्व प्राथमिक शाळांकडूनही ऑनलाईन शिक्षणाचा फंडा शुल्कवसुलीसाठी प्रवेशप्रक्रियेचा घाट

नाशिक : सरकारने पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शिक्षण प्रणालीत समावेश करून नये, असे सष्ट निर्देश दिले असतानाही शहरातील पूर्व प्राथमिक शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा फंडा आजमावत पालकांडून मोठ्या रक्कमांचे शुल्क वसुल करण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यासाठी पालकांना त्यांचे पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी गळ घातली जात असून गेल्या वर्षापेक्षा वाढीव शुल्काची मागणी केली जात असल्याचे प्रकार सुरू आहे. 
देशभरातील शाळा महाविद्यालये ऑगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी अनेक खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून वगळावे अशा स्पष्ट शुचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. परंतु, तरही अगदी नर्सरी सोबतच ज्युनियर केजी व सिनियर केजीचे वर्ग चालविणाऱ्या खासगी शाळांनीही आॅनलाइन शिक्षण सुरू केले आहे. गेल्या वर्षी पालकांसोबत संवाद साधण्यासाठी तयार केलेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून लिंक शेअर करून या शाळांनी विद्यार्थ्यांच्या नवीन वर्षांची सुरुवात केली. यात मागील वर्षात विद्यार्थ्यांना शिकविलेल्या अभ्यासक्रमासह विविध प्रकारच्या कार्यानुभवांच्या प्रात्यक्षिकांची उजळणीही करून घेतानाच नवीन वर्षात प्रवेशासाठी पालकांना गळ घातली जात आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन शिक्षणासाठी एकीकडे पालकांना विद्यार्थ्यांसमवेत बसून वेळ घालवावा लागतो. त्यासाठी स्मार्टफोन व इंटरनेट चा खर्चही करावा लागतो. तर दुसरीकडे शाळांचा ऑनलाईन शिक्षणामुळे इमारतीचा देखभाल, दुरुस्ती खर्च, वाहतूक खर्च, सुरक्षा खर्च यामध्ये कापत झाली आहे. असे असतानाही शाळांक डून गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढीव शुल्काची मागणी केली जात आहे. त्यामुळे पालकांकडू शाळेच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त होत आहे. परंतु, इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपला पाल्य मागे पडू नये,यासाठी पालकांचे प्रयत्न असल्याने कोरोनाच्या या संकटात पालकांचीही कोंडी झाली आहे.

Web Title: Online education for pre-primary students as well; School ferry for fee recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.