ऑनलाइन उद्योजकता विकास प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:14 AM2021-01-22T04:14:02+5:302021-01-22T04:14:02+5:30
...................... रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू नाशिक : ओढा रेल्वेलाइनवर एका इसमाचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. ओढा रेल्वेस्टेशनजीक ...
......................
रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू
नाशिक : ओढा रेल्वेलाइनवर एका इसमाचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. ओढा रेल्वेस्टेशनजीक मध्य रेल्वे डाऊन लाइनवर एका अनोळखी इसमाला रेल्वेगाडीचा धक्का लागल्याने तो मयत अवस्थेत आढळून आला. सदर बाब रेल्वेलाईन कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
.......................
नाशिक पुणे रस्त्यावरील वाहतूक वाढली
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. त्यामुळे या मार्गावरील उपनगरांमधील स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडणेदेखील जिकिरीचे ठरत आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता दुभाजकाला पंक्चर आहेत. मात्र वाहतुकीमुळे रस्ता ओलांडणे कठीण होत आहे.
..................
रस्त्यावरील पार्किंगमुळे अडथळा
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पुुलानजीक असलेल्या सामाजिक न्याय भवनामध्ये अनेक कार्यालये आहेत. या ठिकाणी येणारे इमारतीच्या बाहेरील रस्त्यावर चारचाकी वाहने उभे करतात. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहनधारकांना अडथळा निर्माण होतो. गेल्या आठ-दहा दिवसांपासून येथील वाहनांची संख्या वाढली असल्याचे दिसते.
.....................
गंगापूर-आनंदवली मार्गावर अडथळा
नाशिक : गंगापूर ते आनंदवली या मार्गावर रस्त्याच्या मधाेमध येणाऱ्या झाडांमुळे अडथळा होत आहे. या मार्गावर सुसाट वेगाने वाहन चालविले जात असून, चारचाकी आणि दुचाकी वाहनांची वर्दळ कायम असते. अनेकदा रस्त्याच्या मधोमध असलेल्या वाहनांमुळे वाहनधारकांचा गोंधळ उडतो.
............................
आंबेडकर विचारमंचतर्फे वधूवर मेळावा
नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्यावतीने येत्या २४ रोजी वधूवर पालक परिचय मेळावा आयेाजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विवाहोत्सुक वधूवरांच्या पालकांचा परिचय करून दिला जाणार आहे. या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
.......................
छावा क्रांतीवर संघटनेच्यावतीने निवेदन
नाशिक: छावा जनक्रांती संघटनेच्यावतीने संस्थापक अध्यक्ष शरदअण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जातप्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाला निवेदन देण्यात आले. पडताळणीसाठी असलेली प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी ॲड. अलका शेळके, आशा बाेराडे, रोहिणी साळवे, वैभव गवाल, विठ्ठल नागरे, रियाज शेख, श्रीकांत पेखळे, शांतीलाल निकम आदी उपस्थित होते.