स्वरचित काव्य वाचनासह ऑनलाइन निबंध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:33 AM2021-01-13T04:33:34+5:302021-01-13T04:33:34+5:30

नाशिक : कुसुमाग्रज मराठी विचार मंचातर्फे ‘स्वरचित काव्य वाचन स्पर्धा (ऑनलाइन)’ आणि ‘निबंध स्पर्धा (ऑनलाइन)’ आयोजित करण्यात आल्या आहेत. ...

Online essay competition with self-written poetry reading | स्वरचित काव्य वाचनासह ऑनलाइन निबंध स्पर्धा

स्वरचित काव्य वाचनासह ऑनलाइन निबंध स्पर्धा

Next

नाशिक : कुसुमाग्रज मराठी विचार मंचातर्फे ‘स्वरचित काव्य वाचन स्पर्धा (ऑनलाइन)’ आणि ‘निबंध स्पर्धा (ऑनलाइन)’ आयोजित करण्यात आल्या आहेत. वि.वा. शिरवाडकर अर्थात, कुसुमाग्रजांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी ’मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून स्वरचित काव्य वाचन स्पर्धेसाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. स्पर्धा १४ वर्षांवरील सर्वांसाठी खुली असेल, स्पर्धकाने स्वत: लिहिलेल्या, आधी कुठेही प्रकाशित अथवा प्रसिद्ध न झालेली आणि इतर कोणत्याही स्पर्धेमधे सहभागासाठी न पाठविलेली मराठी भाषेतील कवितेचा स्वत: केलेल्या अभिवाचनाचा कोणत्याही प्रकारे संकलित न केलेला व्हिडीओ सादर करणे बंधनकारक आहे, तसेच सादरीकरणासाठी प्रत्येक स्पर्धकाला जास्तीतजास्त चार मिनिटांचा कालावधी देण्यात आलेला आहे, तसेच सादरीकरणाचा कोणत्याही प्रकारे संकलित न केलेला मूळ व्हिडीओ पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Online essay competition with self-written poetry reading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.