ऑनलाइन जुगार चालविणाऱ्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:18 AM2021-08-25T04:18:28+5:302021-08-25T04:18:28+5:30
मोक्कान्वये कारवाईची मागणी येवला : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर पोलिसांना निवेदन येवला : ऑनलाइन रौलेट (बिंगो) फेक जुगार चालविणाऱ्यांवर ...
मोक्कान्वये कारवाईची मागणी
येवला : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर पोलिसांना निवेदन
येवला : ऑनलाइन रौलेट (बिंगो) फेक जुगार चालविणाऱ्यांवर मोक्कान्वये कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात गेमकिंग कंपनीचे रौलेट (बिंगो) नावाने ऑनलाइन जुगारीची लिंक व ॲपच्या माध्यमातून फेक जुगार चालविला जात आहे. यात हजारो युवकांना आर्थिक, मानसिक व तसेच गुंडाच्या माध्यमातून शारीरिक छळाला सामोरे जावे लागले आहे. जिल्ह्यातील काही भागामध्ये तर अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी सर्वंकष चौकशी केल्यास जिल्ह्यातील गुन्हेगारांची मोठी साखळी हाती येईल, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी १५ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.
निवेदनावर राष्ट्रवादी विद्यार्थी सोशल मीडिया प्रमुख संदीप बोढरे, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा संघटक सागर घोडेराव, अक्षय राजपूत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी सुमित थोरात, गोटू मांजरे, मयूर सोनवणे, जितेंद्र बाकळे, मारुती मोरे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
(२३ येवला पोलिस)
230821\402023nsk_37_23082021_13.jpg
येवला राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसचे शहर पोलिस ठाण्यास निवेदन.