‘ओटीपी’ दिला नाही तरीही ऑनलाइन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 01:38 AM2022-06-15T01:38:22+5:302022-06-15T01:38:39+5:30

ऑनलाइन फसवणुकीत ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) दिल्यानंतर बँक खातेधारकाच्या खात्यातील पैसे दुसऱ्या खात्यात वर्ग झाल्याच्या घटना घडतात. मात्र एका भामट्याने नागरिकाला चक्क ओटीपी न विचारता आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन पद्धतीने क्रेडिट कार्डवरून परस्पर तीन लाख रुपयांचे व्यवहार चोरट्याने फसवणूक केली आहे.

Online Ganda even though ‘OTP’ is not given | ‘ओटीपी’ दिला नाही तरीही ऑनलाइन गंडा

‘ओटीपी’ दिला नाही तरीही ऑनलाइन गंडा

Next

नाशिक : ऑनलाइन फसवणुकीत ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) दिल्यानंतर बँक खातेधारकाच्या खात्यातील पैसे दुसऱ्या खात्यात वर्ग झाल्याच्या घटना घडतात. मात्र एका भामट्याने नागरिकाला चक्क ओटीपी न विचारता आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन पद्धतीने क्रेडिट कार्डवरून परस्पर तीन लाख रुपयांचे व्यवहार चोरट्याने फसवणूक केली आहे.

पाइपलाइनरोडवरील गुलमोहर कॉलनीतील रहिवासी अनिल गोपीचंद चव्हाण (४३) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Online Ganda even though ‘OTP’ is not given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.