लॉन्ड्री व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 04:53 PM2020-07-13T16:53:00+5:302020-07-13T16:53:45+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य धोबी-परीट समाज महासंघाच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्व भाषिक लॉन्ड्री व्यावसायिकांसाठी आॅनलाइन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले ...
नाशिक: महाराष्ट्र राज्य धोबी-परीट समाज महासंघाच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्व भाषिक लॉन्ड्री व्यावसायिकांसाठी आॅनलाइन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तीन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सर्व व्यवहारावर परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे लाँड्री व्यावसायिकांवरही त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. या प्रादुर्भावामुळे काही लाँड्री व्यावसायिकांना आपले प्राण गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच समाज जागृती करण्यासाठी या कोरोनाचा सक्षमपणे सामना कसा करावा यासाठी महाराष्ट्र राज्य धोबी-परीट समाज महासंघ-सर्व भाषिक यांच्या वतीने महाराष्ट्रचे संस्थापक-अध्यक्ष देवराव सोनटक्के, कार्याध्यक्ष अनिल शिंदे आणि महासचिव जयराम वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व लॉन्ड्री व्यावसायिकांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांचे आॅनलाइन वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये पुणे येथील रु बी हॉस्पिटलचे लाँड्री व्यस्थापक अनिल खडके आणि लाँड्री व्यावसायिक सचिन कदम यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. आपला व्यवसाय करताना लाँड्री व्यावसायिकांनी कोणती आणि कशा प्रकारे काळजी घ्यावी त्याचा यामध्ये समावेश होता.
या करोनाच्या काळात लाँड्री व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. तसेच कपडे धुण्याच्या आधी आपले हात स्वछ धुणे आवश्यक आहे, व्यवसाय करताना नागरिकांशी संपर्क येतो त्यासाठी एन-९५ मास्क किंवा थ्री लेयर मास्क आणि ग्लोव्हज वापरावे. आपले ग्राहक आणि आपल्यामध्ये कमीत कमी तीन फुटाचे अंतर राखावे, शक्य असल्यास काच बसवून घेणे, आॅनलाइन बिलिंग अथवा फोन पेचा वापर करावा, वेळोवळी आवश्यकतेनुसार सॅनिटायझरचा वापर करावा याचबरोबर इतर काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. या कार्यक्र मासाठी महाराष्ट्राच्या महिला प्रमुख अरु णा रायपुरे, कोषाध्यक्ष संजय कनोजिया, रु केश मोतीकर, उपाध्यक्ष सुहास मोगरे, सचिव गणेश खर्चे, उपाध्यक्ष लल्लन कनोजिया, ओम बुंदेले उपस्थित होते. कार्यक्र माचे आयोजन महासंघाच्या लाँड्री विभागाचे अध्यक्ष सुनील पवार, आरोग्य विभागाचे अध्यक्ष राजेश मुके, कला-क्र ीडा आणि प्रसिद्धीप्रमुख मनोज म्हस्के यांनी केले. या कार्यक्र माची प्रस्तावना जयराम वाघ यांनी, सूत्रसंचालन मनोज म्हस्के यांनी, तर आभार प्रदर्शन संजय सुरडकर यांनी केले.