बारावीच्या परीक्षार्थींसाठी ऑनलाईन हॉल तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:38+5:302021-04-04T04:15:38+5:30
विद्यार्थ्यांना हॉल तिकिटांसंदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याचे ...
विद्यार्थ्यांना हॉल तिकिटांसंदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याचे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षार्थींकडून हॉल तिकीटासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, विद्यार्थ्यांकडून हॉल तिकीट गहाळ झाल्यास संबंधित शाळा महाविद्यालयांनी त्याची पुन्हा दुसरी प्रत काढून लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन ती विद्यार्थ्यांस द्यावी, अशा सूचनाही त्यांनी या माध्यमातून केल्या आहेत.
इन्फो-
मुख्याध्यापकांचा शिक्का, स्वाक्षरी करवून घेणे अनिवार्य
विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाऊनलोड केल्यानंतर त्यावर मुख्याध्यापकांचा किंवा प्राचार्यांचा शिक्का व स्वाक्षरी करवून घेणे अनिवार्य आहे. तसेच डाऊनलोड केलेल्या हॉल तिकीटात विषय आणि माध्यम यात बदल असल्यास त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात, फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवावी. फोटो चुकीचा असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का व स्वाक्षरीसह प्रमाणित करणे अनिवार्य असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.