मास्कधारक ग्राहकांनाच दुकानात प्रवेश ; व्यावसायिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 07:16 PM2020-06-28T19:16:37+5:302020-06-28T19:20:01+5:30
शहरातील व्यावसायिकाकांडून विशेष काळजी घेतली जात असून तोंडाला मास्क लावलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायजरने हातांचे निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले जात आहे.
नाशिक : कोरनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यावसायिकाकांडून विशेष काळजी घेतली जात असून तोंडाला मास्क लावलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायजरने हातांचे निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले जात असून अशाप्रकारे आवश्यक ती खबरदारी घेऊन कोरोनावर मात करण्याची तयारी नाशिककरांनी केली आहे.
नाशिक शहरातील विविध प्रकारची दुकाने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अनिश्चतेचा सामना करीत असताना आता सरकारने दुकाने सुरू ठेवण्यास परवनागी दिल्यानंतर कोरोनाचा सामना करण्याचे मोठे आव्हान व्यावसायिकांसमोर निर्माण झाले आहे. या आव्हाणाला सामोर जाताना व्यावसायिकांनी खबरदारीच्या आवश्यक त्या उपाययोजना केले आहेत. अनेक दुकानदारांनी, हॉटेल चालकांनी त्यांच्या दुकानाबाहेर फलक लाऊन ग्राहकांना मास्क लावूनच दुकानात प्रवेश करण्याची सुचना केली असून दुकानात प्रवेश करतानाच ग्राहकाच्या हातावर सॅनिटायझर देऊन निर्जंतुकीकरण केले जात आहे. त्याचप्रमाणे दुकानांती वेगवेगल्या वस्तुंना हाताळण्यापेक्षा विक्रेते स्वतंत्र एकएक वस्तू ग्राहकांना दाखवून त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकार व्यावसायिक कोरोनाचा सामना करीत असताना ग्राहकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेऊन कोरोना प्रकिबंधात्मक उपाय अंगिकारण्याचे आवाहन व्यापारी संघटना व व्यावसायिकांकडून होत आहे.