२६ एप्रिलपासून ऑनलाइन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:13 AM2021-04-19T04:13:02+5:302021-04-19T04:13:02+5:30
नाशिक : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून सोमवार (दि. २६) पासून ऑनलाइन ...
नाशिक : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून सोमवार (दि. २६) पासून ऑनलाइन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून हा रोजगार मेळावा शुक्रवार (दि. ३०) पर्यंत सलग पाच दिवस सुरू राहणार आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या कार्यालयात नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मदत होण्याच्या दृष्टीने हा ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सहभागी उमेदवारांच्या मुलाखती मोबाइल दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या काळात स्थलांतरामुळे काही औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. यामुळे नियोक्ते आणि नोकरी इच्छुक उमेदवार यांना एका छत्राखाली सुविधा उपलब्ध होण्याकरिता महास्वयं वेबपोर्टलवरून २६ ते ३० एप्रिल या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे.