याेग दिनानिमित्ताने ऑनलाइन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:10 AM2021-06-21T04:10:47+5:302021-06-21T04:10:47+5:30
लर्निंग लायसन्स बाबतीत तक्रारी नाशिक: शासनाच्या धोरणानुसार आता लर्निंग लायसन्स घरबसल्या मिळत असले, तरी याबाबत अनेक तक्रारी परिवहन कार्यालयास ...
लर्निंग लायसन्स बाबतीत तक्रारी
नाशिक: शासनाच्या धोरणानुसार आता लर्निंग लायसन्स घरबसल्या मिळत असले, तरी याबाबत अनेक तक्रारी परिवहन कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. यापूर्वी उमेदवाराला वाहन चालविण्याची चाचणी द्यावी लागत होती. आता केवळ परीक्षा द्यावी लागत असून, प्रत्यक्ष उमेदवाराऐवजी इतर लोक परीक्षा देत, असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
गोदावरीतील पानवेली काढण्यास प्रारंभ
नाशिक: सायखेडा ते चांदोरीदरम्यान नदीपात्रावर पसरलेली पानवेली काढण्यास प्रारंभ झाला आहे. येथील पानवेली काढण्याबाबतची मागणी नागरिकांनी केली होती. बोटीच्या साह्याने पानवेली काढली जात असल्याने, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पानवेलींमुळे जलचर धोक्यात आल्याची नागरिकांनी तक्रार होती.
टपाल विभागाचा योग दिनी उपक्रम
नाशिक: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने टपाल विभागाने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. दि. २१ रोजी योग दिनानिमित्ताने वेबिनारचे आयेाजन करण्यात आले आहे. ‘योग करा घरी राहा’ या विषयावर कर्मचाऱ्यांसाठी योग विषयक वेबिनार होणार आहे, अशी माहिती टपाल खात्याकडून देण्यात आली.
बालकामगार विषयावर निबंध स्पर्धा
नाशिक: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित टीकेआयएच विद्यालयात जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्ताने ऑनलाइन व्याख्यान, तसेच निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बालकांचे शोषण आणि कामगार कायदा, बालकांचे हक्क विषयावर प्रकाश टाकण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक व्ही.एस. पगार, आर.ए. पवार उपस्थित होते.
वारसांना सामावून घेण्याची मागणी
नाशिक: सम्यक शक्ती जनरल कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन सफार्स सेवकांच्या वारसांना नोकरीत सामावून घ्यावे, अशा मागणीचे निवेदन सादर केले. लाड कमेटी व पागे समितीच्या शिफारशीनुसार एस.सी, एस.टी, व्हीजेएनटी व ओबीसी प्रवर्गातील सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीस सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.
धार्मिक स्थळे सुरू करण्याची मागणी
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे सुरू करावीत, अशी मागणी अखिल भारतीय वारकरी महामंडळाने केली आहे. मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, सप्ताह सुरू करण्यासाठी अटी-शर्तींसह परवानी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय वारकरी महामंडळाने विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रेल्वे एम्प्लॉइजची ऑनलाइन बैठक
नाशिक : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन मध्य रेल्वे झोनची बैठक ऑनलाइन पार पडली. या बैठकीस कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या काळात करण्यात आलेल्या कामाबाबतही चर्चा झाली. मनमाड शाखेतर्फे करण्यात आलेले लसीकरण, तसेच नाशिक रोड वर्कशॉप शाखेतर्फे मिलिंद देहाडे यांनी केेलेल्या किराणा माल वाटपाचे कौतुक करण्यत आले.