दहावीनंतर डिप्लोमा प्रवेशासाठी २३ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:10 AM2021-07-12T04:10:45+5:302021-07-12T04:10:45+5:30

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या दहावीनंतरच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिये दि.३० जूनपासून ...

Online registration for diploma admission after 10th till July 23 | दहावीनंतर डिप्लोमा प्रवेशासाठी २३ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी

दहावीनंतर डिप्लोमा प्रवेशासाठी २३ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी

Next

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या दहावीनंतरच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिये दि.३० जूनपासून सुरुवात झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांना २३ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन नाशिकसह जिल्ह्यातील २५ तंत्रनिकेतन महाविद्यालयांतील विविध सुविधा व मार्गदर्शन केंद्राचीही सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या सुविधा व मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून मोफत नोंदणी अर्ज व कागदपत्र अपलोड करता येणार आहे.

नाशिक जिल्ह्यात दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यात २५ महाविद्यालयांमध्ये ९ हजार २५४ जागा उपलब्ध आहेत. या जागावंर प्रवेशासाठी ३० जूनपासून ऑनलाइन नोंदणीस सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना २३ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्यासोबतच कागदपत्रांच्या स्कॅन छायांकित प्रती अपलोड करण्यासोबतच ई-स्क्रूटनी अथवा प्रत्यक्ष स्क्रूटनीचा वापर करून पडताळणीही करून घेता येणार आहे. त्यानंतर २६ जुलैला तात्पुरत्या (प्रारूप) गुणवत्ता याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या याद्यांवर २७ ते २९ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना आक्षेप अथवा हरकती नोंदविता येणार आहेत. त्यानंतर ३१ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. अंतिम गुणणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालयाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नाशिक शासकीय तंत्रनिकेतनसह जिल्ह्यातील विविध तंत्रनिकेतन महाविद्याल्यांमध्येही सुविधा व मार्गदर्शन केंद्राची सुरुवात करण्यात आली असून, या केंद्राचे कामकाज बुधवारी (दि. ३०) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना त्यांना अर्ज व कागदपत्र अपलोड करण्यासाठी व पडताळणीसाठी ‘ई-स्क्रूटनी’ आणि ‘प्रत्यक्ष स्क्रूटनी’चा पर्याय उपलब्ध असून, विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार पर्याय निवडू शकणार आहेत.

इन्फो-

मागील वर्षी ५६ टक्के प्रवेश

जिल्ह्यातील महाविद्यालये- २५

उपलब्ध जागा- ९२५४

गत वर्षातील प्रवेश- ५१७८

गतवर्षीच्या रिक्त जागा- ४०७६

Web Title: Online registration for diploma admission after 10th till July 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.