औषधनिर्माणशास्त्र पदविकेसाठी २ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:12+5:302021-07-14T04:18:12+5:30

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र पदविका, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग, सरफेस ...

Online registration for Pharmacology Diploma by 2nd August | औषधनिर्माणशास्त्र पदविकेसाठी २ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंदणी

औषधनिर्माणशास्त्र पदविकेसाठी २ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंदणी

googlenewsNext

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र पदविका, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आहे. या अभ्यासक्रम प्रवेशासाठी रविवार(दि.१०)पासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांना २ ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी बारावीनंतर औषधनिर्माणशास्त्र पदविका, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रम राबविणाऱ्या शासकीय, अशासकीय, अनुदानित, विद्यापीठ संचलित व खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायांकित प्रति अपलोड करणे, कागदपत्र पडताळणी करणे यासोबतच अर्ज निश्चिती करण्याचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना १० जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत योग्य ई- स्क्रूटनी अथवा प्रत्यक्ष स्क्रूटनीची निवड करून ऑनलाईन नाव नोंदणी, कागदपत्र अपलोड करण्याची प्रक्रिया करता येणार आहे. याच काालावधीत विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी व अर्जाची निश्चिती करावी लागणार आहे. त्यानंतर ५ ऑगस्टला संकेतस्थळावर प्रारुप गुणवत्ता जाहीर केली जाणार आहे. या तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर ६ ते ८ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार असून, १० ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. पुढील प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तंत्रशिक्षण संचालनायाच्या संकेतस्थळावार जाहीर केले जाणार आहे. दरम्यान, मागील वर्षात नाशिक जिल्ह्यातील ३१ महाविद्यालयांमध्ये औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या उपलब्ध १ हजार ५५३ जागांवर तब्बल १९३६ म्हणजेच सुमारे ९९ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते. त्यामुळे यावर्षीही फार्मसी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस दिसून येण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

इन्फो -

जिल्ह्यातील महाविद्यालये व जागा

डी.फार्मसी महाविद्यालये - ३१

उपलब्ध जागा - १९५३

मागील वर्षातील प्रवेश १९३६

Web Title: Online registration for Pharmacology Diploma by 2nd August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.