आज दहावीचा आॅनलाईन निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:04 PM2020-07-28T23:04:51+5:302020-07-29T01:04:31+5:30
नाशिक : देशात कोरोनाचे सावट वाढत असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल बुधवारी (दि.२९) जाहीर होणार असल्याची माहिती राज्यमंडळाने दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : देशात कोरोनाचे सावट वाढत असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल बुधवारी (दि.२९) जाहीर होणार असल्याची माहिती राज्यमंडळाने दिली आहे.
कोरोनामुळे लांबलेला निकाल अखेर जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, दहावी परीक्षांचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रांत भविष्यातील करिअरच्या वाटा खुल्या होणार असल्याने नाशिक जिल्ह्णातील ९७ हजार ९१२ विद्यार्थ्यांसह विभागातील २ लाख १६ हजार ३७५ विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. राज्यात ३ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत अखेरचा भुगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे उर्वरित पाच विषयांचे सरासरी गुण लक्षात घेऊन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. त्यानुसार बुधवारी निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल आॅनलाइन जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना निकालाची प्रत डाऊनलोड करून त्यांची प्रिंट काढता येणार आहे.जिल्ह्यात ९७ हजार ९१२ परीक्षार्थीनाशिक जिल्ह्णात २०२ परीक्षा केंद्रांवर ९७ हजार ९१२ विद्यार्थ्यांनी, तर विभागात ४४५ केंद्रांवर २ लाख १६ हजार ३७५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी व पालकांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली होती.