ऑनलाईन सातबारा उतारा काढण्यासासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:13 PM2019-03-16T13:13:07+5:302019-03-16T13:13:21+5:30

जोरण - बागलाण तालुक्यातील जोरण, कपालेश्वर, किकवारी खुर्द, तळवाडे, किकवारी बुद्रुक, देवपुर, निकवेल, कंधाणा, निरपुर, तिळवण, विंचुरे तसेच संपुर्ण पश्चिम पट्यातील परिसरातील गावातील शेतकऱ्यांना ऑनलाईन सात बारा मिळविण्यासाठी हाल होत आहे.

Online runway for farmers to run online | ऑनलाईन सातबारा उतारा काढण्यासासाठी शेतकऱ्यांची धावपळ

ऑनलाईन सातबारा उतारा काढण्यासासाठी शेतकऱ्यांची धावपळ

Next

ऑनलाईन सातबारा उतारा काढण्यासासाठी शेतकऱ्यांची धावपळ
जोरण - बागलाण तालुक्यातील जोरण, कपालेश्वर, किकवारी खुर्द, तळवाडे, किकवारी बुद्रुक, देवपुर, निकवेल, कंधाणा, निरपुर, तिळवण, विंचुरे तसेच संपुर्ण पश्चिम पट्यातील परिसरातील गावातील शेतकऱ्यांना ऑनलाईन सात बारा मिळविण्यासाठी हाल होत आहे. तलाठी कार्यालयात संगणक व प्रिंटर नसल्यामुळे गावांपासून २५ ते ३० किलोमीटरपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तासनतास रागेत उभे राहून सात बारा काढावा लागत असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यात सर्व्हर डाऊन झाले तर दिवस दिवस रांगेत उभे राहावे लागत आहे. सध्या कांदा विक्र ी आनुदानाची तारीख वाढवल्यामुळे बाजार समितीत लागत असल्यामुळे शेतीची कामे बंद करून सात बारा काढण्यासाठी तासन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. शासनाने कांदा अनुदानाची मुदत सलग तीन महिन्यापासून वाढतच असून ती आता २८ फेब्रुवारीपर्यंत केली होती मात्र शेवटपर्यंत प्रशासन शेतकºयांना सातबारे पुरवण्यात अपयशी ठरले आहे.

Web Title: Online runway for farmers to run online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक