नाशकात पेपर ग्लास खरेदीच्या बहाण्याने 91 हजारांचा ऑनलाईन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 05:59 PM2020-06-23T17:59:52+5:302020-06-23T18:12:14+5:30

पंचवटीतील एका दुकानात काम करणाऱ्या कामगारास पेपरग्लास खरेदीच्या व्यवहाराचा बहाण्याने क्यूआर कोड पाठवून त्याची ९१ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. 

An online scam of Rs 91,000 under the pretext of buying a paper glass in Nashik | नाशकात पेपर ग्लास खरेदीच्या बहाण्याने 91 हजारांचा ऑनलाईन गंडा

नाशकात पेपर ग्लास खरेदीच्या बहाण्याने 91 हजारांचा ऑनलाईन गंडा

googlenewsNext
ठळक मुद्देदुकानात काम करणाराला ऑनलाईन गंडा खरेदीच्या बहाण्याने ऑनलाईन लुटले 91 हजार रुपये

नाशिक : पंचवटीतील एका दुकानात काम करणाऱ्या कामगारास पेपरग्लास खरेदीच्या व्यवहाराचा बहाण्याने क्यूआर कोड पाठवून त्याची ९१ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटीतील एका दुकानाला ऑनलाइन पेपरग्लास खरेदीसाठी मागणी आली होती. त्यानुसार त्याने दुकानात कामाला असणाऱ्या दीपक वाल्मीक डावरे यास संबंधित ग्राहकाची मागणी नोंदवून त्यांना मालाची विक्री करण्यास सांगितले. त्यानुसार, ग्राहकाशी झालेल्या बोलण्यानुसार, दीपक डावरे याला संशयित आरोपीने क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करून रक्कम स्वीकारण्यास सांगितले. मात्र दीपकने क्यूआर कोड स्कॅन करताच काही क्षणाच्या अंतराने एकदा तेराशे, दोनदा ९ हजार ९९९, एकदा २२ हजार २२२ व एकदा ५ हजार ५५५ असे एकूण ९१ हजार २७५ रुपये त्याच्या खात्यातून काढले गेले. घटनेची कल्पना येताच दीपकने त्यांच्या मालकाला या घटनेची माहिती दिली असून, त्यानंतर सायबर गुन्हे ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दाखल केली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: An online scam of Rs 91,000 under the pretext of buying a paper glass in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.