पुस्तकांशिवाय भरली ऑनलाईन शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:58+5:302021-07-14T04:17:58+5:30

कोरोनामुळे गेल्या वर्षी शाळा बंद करण्यात आल्या, तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुरेपूर प्रयत्न केले. ...

An online school full of books | पुस्तकांशिवाय भरली ऑनलाईन शाळा

पुस्तकांशिवाय भरली ऑनलाईन शाळा

Next

कोरोनामुळे गेल्या वर्षी शाळा बंद करण्यात आल्या, तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुरेपूर प्रयत्न केले. त्यासाठी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली होती. यंदा मात्र जून महिन्यात शैक्षणिक सत्र सुरू झाले तरी देखील शासनाने पाठ्यपुस्तके पुरविलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी निर्माण होत असून, शिक्षकांनाही पुस्तकांविना शिकवावे लागत आहे. एरव्ही शाळेच्या पहिल्याच दिवशी शासनाकडून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी व पालकांचा आर्थिक भार कमी व्हावा, हा यामागचा हेतू असला तरी यंदा मात्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने शाळांकडून पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदवून घेतली; परंतु पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केलेला नाही. अशा परिस्थितीत गेल्या वर्षी वाटप करण्यात आलेली पाठ्यपुस्तके जमा करण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन पाठ्यपुस्तके जमा केली. त्यातून जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी त्याला हातभार लावला व तितक्या पाठ्यपुस्तकांचा संच जमा करण्यात आला आहे.

--------

वर्गनिहाय विद्यार्थी संख्या

पहिली- ५४,७७४

दुसरी- ५७,४४९

तिसरी- ५७,६३६

चौथी- ६२,६४६

पाचवी- ६१, ७८८

सहावी- ६४, ३३२

सातवी- ६६,७७१

आठवी- ६०,४०५

----------

चौकट====

विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे

आपल्याकडील पाठ्यपुस्तके पुन्हा शाळेकडे जमा करून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी नवीन आदर्श निर्माण केला आहे. पाठ्यपुस्तकांच्या छपाईसाठी लागणारा कागद व त्यासाठी झाडांची होणारी हानी, यामुळे टळण्यास मोठा हातभार लागला आहे. पर्यावरणाची जपणूक करतानाच विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच पाठ्यपुस्तके काळजीपूर्वक वापरण्याची सवय लागली आहे.

- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी

--------

एक तृतीयांश विद्यार्थ्यांनी केली पुस्तके जमा

* जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्याकडील चांगले पुस्तके परत करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

* शिक्षक, मुख्याध्यापकांकरवी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांशी व पालकांशी त्यासाठी संपर्क साधण्यात आला.

* जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी आपल्याकडील पुस्तके परत केली.

* ही पुस्तके पुन्हा विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली असून, त्यासाठी विद्यार्थ्यांचा ग्रुप करण्यात आला आहे.

--------------------

पुस्तके नाहीत अभ्यास कसा करणार

शाळा सुरू झाली असून, शिक्षकांकडून ऑनलाईन क्लास घेतले जात आहेत. परंतु अभ्यासक्रमासाठी पुस्तके नसल्याने अडचणी निर्माण होतात.

- भूषण देवरे, विद्यार्थी

------------

आमच्या भागात मोबाईलला रेंज नसल्याने ऑफलाईन शाळा सुरू करण्यात आली आहे. मात्र, शाळेत पुरेसे पुस्तके नसल्याने वर्गातील मुलांचा ग्रुप करून अभ्यास केला जातो.

- संतोष शिंदे, विद्यार्थी

Web Title: An online school full of books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.