शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन बीजप्रक्रिया स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:11 AM2021-05-29T04:11:58+5:302021-05-29T04:11:58+5:30
-------------------- पांढुर्ली उपबाजारात कांदा लिलाव सुरू होणार सिन्नर: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली येथील उपबाजारात कांदा लिलाव पूर्ववत सुरू ...
--------------------
पांढुर्ली उपबाजारात कांदा लिलाव सुरू होणार
सिन्नर: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली येथील उपबाजारात कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सभापती लक्ष्मण शेळके, उपसभापती संजय खैरनार, सचिव विजय विखे यांनी दिली. सोमवार (दि. ३१) पासून सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत लिलाव होणार आहे. शेतमाल विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकरी व व्यापाऱ्यांनी आपली कोरोना टेस्ट करून येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याशिवाय आवारात प्रवेश दिला जाणार नाही. मास्क व सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.
-------------------
वडगाव-सिन्नर येथे लसीकरणाची मागणी
सिन्नर: तालुक्यातील वडगाव-सिन्नर येथे आठवड्यातून एकदा लसीकरण शिबिर घेण्याच्या मागणीचे निवेदन सरपंच मंदाकिनी काळे, उपसरपंच नीलेश बलक, हर्षल काळे यांच्यासह ग्रामस्थांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्याकडे दिले आहे. पास्ते आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या वडगाव-सिन्नर गावात २० किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे गावात दर आठवड्यात लसीकरण शिबिर राबविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
-----------------
रस्ता दुरुस्तीची मागणी
सिन्नर: तालुक्याच्या पूर्व भागातील वावी-दुशिंगपूर- सायाळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. ओझर विमानतळ ते शिर्डी विमानतळ हा रस्ता नव्याने बनविण्यात आला होता. त्यामुळे हा रस्ता चांगला झाला होता. मात्र, समृद्धी महामार्गाच्या कामावर असलेल्या अवजड वाहनांनी या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे.