ग्रामीण भागातही आॅनलाईन खरेदीला आता मोठी पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 02:56 PM2020-09-16T14:56:32+5:302020-09-16T14:56:56+5:30
लखमापूर : ग्रामीण भागात व शहरी भागात कोरोना मुळेसर्वच नागरिकांना बाहेर पडणे, जिकरीचे झाले आहे. त्यामुळे काही खरेदी करायचे असले तरी बंधने आली आहे. काही ठिकाणी दुकाने बंद तर काही ठिकाणी चालू ही स्थिती सध्या आहे. यावर पर्याय म्हणून जनतेने सर्व खरेदी आॅनलाईन पध्दतीने करट्याचा नवीन पवित्रा घेतला आहे.
लखमापूर : ग्रामीण भागात व शहरी भागात कोरोना मुळेसर्वच नागरिकांना बाहेर पडणे, जिकरीचे झाले आहे. त्यामुळे काही खरेदी करायचे असले तरी बंधने आली आहे. काही ठिकाणी दुकाने बंद तर काही ठिकाणी चालू ही स्थिती सध्या आहे. यावर पर्याय म्हणून जनतेने सर्व खरेदी आॅनलाईन पध्दतीने करट्याचा नवीन पवित्रा घेतला आहे.
प्रत्येक कुटुंबाला काही ना काही जीवनावश्यक वस्तूची खरेदी करणे गरजेचे असते. त्यासाठी कोणी खुल्या बाजाराला पसंती देतो, तर कोणी मॉलमध्ये जाऊन खरेदी करतात. परंतु आता मात्र कोरोनाचे वातावरण सगळीकडे मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे नागरिकांनी याला पर्याय म्हणून घरच्या घरी आॅनलाईन खरेदीला पसंती दिली आहे.
बाजारपेठेत सध्या ग्राहक कमी जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामुळे दुकानदार लॉक डाऊनच्या नावाखाली वस्तूच्या किंमती जास्त वाढून देतात. परंतु ग्राहकांना गरज असल्यामुळे ती वस्तू जास्त भावाने खरेदी करावी लागते.परंतु आता मात्र ग्राहक वर्गाने या आर्थिक संकटातून सुटका मिळावी म्हणून आॅनलाईन अॅपव्दारे घरच्या घरी विविध वस्तू खरेदी करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे जास्त किंमत देऊन वस्तू खरेदी करण्यापेक्षा आता आॅनलाईन खरेदी ने खरेदी केल्यास विशेष सुट व घर पोच वस्तू मिळत असल्यामुळे ग्राहक खुश झालाआहे.
आॅनलाईन खरेदीसाठी सध्या बरीच कंपन्यानी आपले चांगले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्याचा फायदा ग्राहक वर्गाला मिळत असल्यामुळे सुमारे ५० ते ६० टक्के नागरिकांनी आता आॅनलाईन खरेदीलाच पसंती दिली आहे.
आॅनलाईनव्दारे ग्राहकांना घरगुती वस्तू, फर्नीचर, कपडे, बूट, घड्याळ, तसेच चैनीच्या अन् विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू, इ. आॅनलाईन खरेदी करता येत असल्यामुळे ग्राहक वर्ग घराच्या बाहेर न पडता व कोरोना पासून दुर राहाण्यासाठी मदत होत आहे.
विविध कंपन्यानी दिलेल्या आॅनलाईन वस्तू खरेदी मुळे आम्ही आॅनलाईन वस्तू खरेदी करून घेत आहे. आमचा वेळ, पैसा आदींची आर्थिक हानी टळली असून घर बसल्या चांगल्या वस्तू मिळत असल्यामुळे आम्ही खुश आहे.
- उमेश पगारे, आॅनलाईन, ग्राहक. (१६ लखमापूर)