प्राध्यापकांचाही ऑनलाईन पद्धतीने कौशल्य विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 06:28 PM2020-06-07T18:28:38+5:302020-06-07T18:30:31+5:30

कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालातील विद्युत अभियांत्रिकी विभा गाकडून तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून  प्राध्यापकांसाठीही कौश्यल्य विकास कार्यक्रम राबविण्यात आला. आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग अँप्लिकेशन इन पॉवर सिस्टिम विषयांवरील कौशल्य विकास कार्यक्रमात ३०५ प्राध्यापकांनी सहभाग घेतला .

Online skill development of professors also | प्राध्यापकांचाही ऑनलाईन पद्धतीने कौशल्य विकास

प्राध्यापकांचाही ऑनलाईन पद्धतीने कौशल्य विकास

Next
ठळक मुद्दे प्राध्यापकांसाठी कौश्यल्य विकास कार्यक्रम तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेतून प्राध्यपकांना प्रशिक्षण

नाशिक: शहरातील कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालातील विद्युत अभियांत्रिकी विभागाकडून तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून  प्राध्यापकांसाठीही कौश्यल्य विकास कार्यक्रम राबविण्यात आला. आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग अँप्लिकेशन इन पॉवर सिस्टिम विषयांवरील कौशल्य विकास कार्यक्रमात ३०५ प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता.
संपूर्ण देशभरातील औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिक, प्राध्यापक, संशोधक आणि पदव्युत्तर विद्यार्थी यांचा समावेश होता. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था जयपूरचे डॉ. राजेश कुमार, पंडित दीनदयाळ विद्यापीठ गांधीनगरचे डॉ. अमित संत, राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजिचे डॉ. व्ही. एन. कलखांबकर, सपट अभियांत्रिकीचे डॉ. अतुल कोष्टी व पुणे येथीलडॉ. सुष्मा शेळके यांनी ऑनलाईन व्याख्यानांच्या माध्यमातून प्राध्यापकांना आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग अँप्लिकेशन इन पॉवर सिस्टिम विषयां संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. शेवटी विद्युत अभियांत्रिकी विभागातील सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधक प्रा. पंकज गौतम यांनी हार्डवेअर प्रणाली संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमातून ‘पॉवर सिस्टिम्स’ क्षेत्रातील संशोधन संधी या विषयावर सखोल माहिती देण्यात आली. 

Web Title: Online skill development of professors also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.