गुरु कुलातही ‘आॅनलाइन’ अध्ययन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 12:07 AM2020-07-07T00:07:23+5:302020-07-07T01:28:33+5:30
गुरुकुल म्हणजेच गुरु गृही निवासी राहूनच वेद अध्ययन अध्यापन होत असते. नाशिक तीर्थक्षेत्राला गुरुकुलाची प्राचीन परंपरा लाभली आहे. परंतु कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच गुरुकुलातील छात्रांना स्वघरी पाठविण्यात आले आहे. महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानमधील सर्व छात्र घरीच बसून मोबाइलवर व्हिडिओ कॉलिंगद्वारे अध्ययन करीत आहेत.
नाशिक : गुरुकुल म्हणजेच गुरु गृही निवासी राहूनच वेद अध्ययन अध्यापन होत असते. नाशिक तीर्थक्षेत्राला गुरुकुलाची प्राचीन परंपरा लाभली आहे. परंतु कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच गुरुकुलातील छात्रांना स्वघरी पाठविण्यात आले आहे. महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानमधील सर्व छात्र घरीच बसून मोबाइलवर व्हिडिओ कॉलिंगद्वारे अध्ययन करीत आहेत.
मनुष्यबळ विकास मंत्रालय भारत सरकारद्वारा संचलित उज्जैनमधील महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान संलग्न देशभरातील सर्व वेद पाठशाळा यांना छात्र अध्ययन पूर्ण व्हावे यासाठी तसेच छात्र्यांचे वर्ष वाया जाता कामा नये म्हणून सर्व वैदिक कुलगुरूंना गुरुकुल यांना आॅनलाइन व्हिडिओद्वारे शिकवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पंचवटीतील महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने छात्र रोज आपापल्या विषयाचे रोज एक तास गुरुजींकडून आॅनलाइन अध्ययन घेत आहे. त्यामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात या अन्य राज्यांतील छात्राबरोबरच औरंगाबाद, नांदगाव, सिन्नर, जालना, येवला आदी शहरात असलेले सुमारे २५ छात्र रोज नियमाने अध्ययन करीत आहेत.
‘गुरुबिन ज्ञान नाही’ हे खरे असून, इतर विषय किंवा आधुनिक विषय वाचून कळतात, पण तू वेद अध्ययन हे गुरुंनी सांगितल्यावरच ते उच्चारायचे असते. कारण केवळ शब्द वाचून म्हणणे योग्य नसते. गुरु कडे मुख करून वेद पठण सांगितले आहे. कोणतीही महामारी असो किंवा काही अडचण असेल गुरु ने प्रत्यक्ष मंत्र दिल्यावर तो म्हणायचा दंडक आहे. एकदा मंत्राची घेतल्यावर गुरुंना तो हस्त स्वरा सहित म्हणून दाखविणे व आज्ञा मिळाल्यावर ११ वेळेस पठण करून म्हणावी लागते.
गुरु कुलाच्या परंपरेनुसार पंधरा दिवसांत वीस ते पंचवीस मंत्रांची एक संथा अशा १६ संथा पूर्ण कराव्या लागतात. गुरु चरणी यम-नियम पाळून संथा कंठस्थ करून दाखविणे व पुन्हा नवीन मंत्राची संथा घेणे हे व्हिडिओद्वारा सांगत असताना अनेक अडचणी आहेत, परंतु काळानुरूप अध्ययन- अध्यापन सुरू ठेवणे हेच खरे कौशल्य आहे. - वेदमूर्ती रवींद्र पैठणे, गुरु जी