शिक्षकांच्या बदल्या आॅनलाइनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 10:38 PM2020-02-14T22:38:53+5:302020-02-15T00:13:06+5:30
शिक्षकांच्या जिल्हा अंतर व आंतरजिल्हा बदली आॅनलाइनच होणार असून, याबाबत ग्रामविकास विभागाच्या अभ्यास गट आणि शिक्षक संघटनांची पुणे येथे बैठक घेण्यात येऊन त्यात चर्चा करण्यात आली. बदली धोरणात पारदर्शकता यावी यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन केला. संघटनांसमवेत बैठक यशवंतराव चौहान सभागृहात झाली.
मालेगाव : शिक्षकांच्या जिल्हा अंतर व आंतरजिल्हा बदली आॅनलाइनच होणार असून, याबाबत ग्रामविकास विभागाच्या अभ्यास गट आणि शिक्षक संघटनांची पुणे येथे बैठक घेण्यात येऊन त्यात चर्चा करण्यात आली. बदली धोरणात पारदर्शकता यावी यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन केला. संघटनांसमवेत बैठक यशवंतराव चौहान सभागृहात झाली. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या वतीने आंतरजिल्हा व जिल्हा आंतर बदलीबाबत निवेदन देण्यात आले. उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी निवेदन दिले.
महानगरपालिका, नगरपालिका इच्छुक शिक्षकांची आॅनलाइन बदली व्हावी, पती-पत्नी दोघेही सेवेत आहेत त्यांना एका युनिट समजून ५ वर्ष बदलीत सूट मिळावी, राज्यातील एक रोस्टर करावे, जिल्हाआंतर बदली पूर्वी सर्व जागा भरण्यात याव्यात, या मागण्या करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बदली संगणकाद्वारे आॅनलाइनच करावी. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीत ज्या ठिकाणी एससी, एसटी आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उर्दू माध्यम उमेदवार उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पदस्थापना देण्यात यावी. जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे ही जाचक अटी रद्द करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत़