शेकडो शिक्षकांची आॅनलाईन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 08:55 PM2020-07-27T20:55:38+5:302020-07-27T23:29:56+5:30
दिंडोरी : कारोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे आॅनलाईन शिक्षण कसे सुरू ठेवता येईल यासंदर्भात शिक्षकांना आॅनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी दिंडोरी केंद्रातील जनता इंग्लिश स्कुल माध्यमिक विभाग, उच्च माध्यमिक विभाग व अभिनव बालविकास व इतर शाळेतील शेकडो शिक्षकांची आॅनलाईन कार्यशाळा संपन्न झाली.

दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बी. डी. कनोज यांनी प्रशिक्षणाचे आॅनलाइन उदघाटन करून प्रशिक्षणाचा उद्देश सांगितला. शिक्षण विस्तार अधिकारी व कार्यशाळेचे सनियंत्रक एस. पी. पगार यांनी प्रास्तविकात प्रशिक्षणबाबत माहिती दिली.
यावेळी प्रकाश चव्हाण, विलास जमदाडे दत्तात्रय चौगुले, नौशाद अब्बास यांनी झूममिट, गुगलमिट, जिओमिट, गुगल क्लासरूम, टेलिग्रामवरील नाशिक शिक्षण हेल्पलाईन चॅनल, जिओ चॅट, एमससीईआरटीचे चॅनल तसेच व्हिडीओ कॉलिंग, कॉन्फरन्स कॉलिंग, गुगलवर आॅनलाइन टेस्ट तयार करणे यासंदर्भात आॅनलाईनरीत्या प्रत्यक्ष डेमो व पीडीएफ दाखवून विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा यासंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन केले व शंकांचे निरसन केले.
या प्रशिक्षणास एकूण १००हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते व प्रशिक्षण संपल्यावर त्या सर्वांनी आॅनलाइन प्रमाणपत्र पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी प्राचार्य बी. जी. पाटील, उपमुख्याध्यापक यु. डी. भरसट, पर्यवेक्षक बी. बी. पुरकर, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभातील शिक्षक सहभागी झाले होते. आभार संतोष कथार यांनी मानले.