येवला तालुक्यात अवघे १७०० पीकविमाधारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:10 AM2021-07-19T04:10:57+5:302021-07-19T04:10:57+5:30
२०१९ मध्ये २२ हजार शेतकऱ्यांनी तर २०२० मध्ये १४ हजार पाच शेतकऱ्यांनी आणि २०२१ ला पंधरा जुलैपर्यंत ...
२०१९ मध्ये २२ हजार शेतकऱ्यांनी तर २०२० मध्ये १४ हजार पाच शेतकऱ्यांनी आणि २०२१ ला पंधरा जुलैपर्यंत फक्त सतराशे शेतकऱ्यांनी विमा उतरविल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून परतीचा पाऊस पडून पिकांचे नुकसान होत आहे. दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी काढलेल्या पीकविम्याचे पैसे मिळाले होते, पण मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी पिकाचा काढलेला विमा नुकसान होऊनही मात्र मंजूर नसल्याने या वर्षी शेतकऱ्यांनी खरिपाचा पीकविमा भरण्याकडे पाठ फिरवल्याचे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. खरिपाच्या पेरणीकरिता शेतकरी कर्ज काढून, उसनवारीने किंवा आपले दागिने गहाण ठेवून शेतात खरिपाची पेरणी करत असतो व उरलेल्या पैशांतून पिकाचा विमा भरत असतो. त्यातच कधी काळी पिके जोमात असताना पाऊस दांडी मारतो. तर कधी हातातोंडाशी आलेला घास अतिपावसाने हिरावून घेतला जातो. हक्काच्या पिकाचा काढलेला विमा मंजूर होईल व झालेले नुकसान भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्याला असते.
इन्फो
पीकविमा घेतलेले शेतकरी
२०१९- २२०००
२०२० - १४००५
२०२१- १७०० (१५ जुलैअखेर)
इन्फो
शेतकरी पीकविमा मुदतवाढ
शासनाने सुरुवातीला प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी १५ जुलै ही तारीख अंतिम केली होती, पण त्याला मुदतवाढ मिळवून २३ जुलै ही विमा भरण्याची अंतिम तारीख केली आहे. कृषी विभागाकडून जनजागृती
शेतकऱ्यांनी आपल्या खरिपाच्या पिकाचा विमा काढून घ्यावा, याकरिता कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन, सोशल मीडियावर जनजागृती केली जात आहे.
कोट....
येवला तालुक्यातील सद्य:स्थितीतील पाऊसमान आवश्यक त्या प्रमाणात समाधानकारक नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची परिस्थितीही पुढील काळातील पडणाऱ्या पाऊसमानावर अवलंबून राहणार असल्याने सर्व शेतकरी बंधूंनी खरीप हंगामातील पिकांचा पीकविमा उतरला पाहिजे. - बी.के. नाईकवाडी, कृषी पर्यवेक्षक, येवला