२० टक्केच तिकिटे पंचवटीसाठी आरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:32 AM2020-09-12T01:32:50+5:302020-09-12T01:33:55+5:30
कोरोनामुळे गेल्या २२ मार्चपासून बंद असलेली चाकरमान्यांची पंचवटी एक्स्प्रेस शनिवारपासून पुन्हा सुरू होत असली तरी, एक्स्प्रेस सुटण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत जेमतेम २० टक्केच आरक्षण तिकीट विक्रीस गेल्याने पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला आहे. पंचवटीसह एकूण ८० स्पेशल ट्रेन देशभरात १२ सप्टेंबरपासून सोडल्या जाणार आहेत.
नाशिकरोड : कोरोनामुळे गेल्या २२ मार्चपासून बंद असलेली चाकरमान्यांची पंचवटी एक्स्प्रेस शनिवारपासून पुन्हा सुरू होत असली तरी, एक्स्प्रेस सुटण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत जेमतेम २० टक्केच आरक्षण तिकीट विक्रीस गेल्याने पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला आहे. पंचवटीसह एकूण ८० स्पेशल ट्रेन देशभरात १२ सप्टेंबरपासून सोडल्या जाणार आहेत.
पंचवटीत एक्स्प्रेसमध्ये १७१४ सीटस आहेत. त्यात सेकंड क्लासचे १५२२, आणि एसीचे १९२ सीट््स आहेत. त्यातील वीस टक्केही तिकिटे विकली गेली नाहीत. गाडीच्या आदल्या दिवशी सायंकाळी साडेसहापर्यंत सेकंड क्लासची २७३, तर एसीची सहा तिकीट विकली गेली आहेत. मुंबईला जाण्यासाठी ९० रुपये तिकिटाचे व ३० रुपये आरक्षणाचे असे १२० रुपये द्यावे लागत आहेत. रोजचा जाऊन-येऊन एकूण २४० रुपये खर्च आहे. कोरोनाबाबतचे निकष, नियम यांचे पालन करावे लागेल. केवळ वैध तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवास करता येईल तसेच प्रतीक्षायादीतील प्रवाशांना परवानगी देण्यात आलेली नाही.
मुंबईहून परत येतानाही दीड तास आधी स्टेशनवर हजर रहावे लागणार आहे. येऊन-जाऊन तीन तास जादा लागणार आहे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्याचे ठरविण्यात आले असून, प्रवासापूर्वी थर्मल स्क्रिनिंगसाठी प्रवाशांना किमान ९० मिनिटे अगोदर यावे लागेल.