नाशिक जिल्ह्यात 28 टक्के इतकाच जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 07:23 PM2018-05-01T19:23:23+5:302018-05-01T19:23:23+5:30

नाशिक जिल्ह्यात गतवर्षी सरासरी पेक्षा अधिक म्हणजे 113 टक्के पाऊस झाला असला तरी यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे धरणांच्या साठ्यात घट होत असून सध्या सरासरी 28 टक्के इतका साठा शिल्लक आहे.

Only 28 percent water storage in Nashik district | नाशिक जिल्ह्यात 28 टक्के इतकाच जलसाठा

नाशिक जिल्ह्यात 28 टक्के इतकाच जलसाठा

Next

नाशिक-  जिल्ह्यात गतवर्षी सरासरी पेक्षा अधिक म्हणजे 113 टक्के पाऊस झाला असला तरी यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे धरणांच्या साठ्यात घट होत असून सध्या सरासरी 28 टक्के इतका साठा शिल्लक आहे. गेल्या महिनाभरातच 16 टक्के पाणी कमी झाले आहे. सध्या गंगापूर धरण समूहात 44 टक्के तर केवळ गंगापूर धरणात 42 टक्के पाणी शिल्लक आहे. दारणा धरण समूहात 48 टक्के, गिरणा धरण समूहात 20 आणि पालखेड धरण समूहात 28 टक्के इतका साठा शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, येवला, सिन्नर, देवळा आणि नांदगाव या सहा तालुक्यात 35 टँकर द्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.

Web Title: Only 28 percent water storage in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.