विशेष फेरीत केवळ ३१ विद्यार्थ्यांचा प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:04 AM2017-10-12T01:04:56+5:302017-10-12T01:06:41+5:30
नाशिक : शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेद्वारे आतापर्यंत २२ हजार ३३ विद्यार्थ्यांनी प्रवेशप्र्रक्रिया पूर्ण केली असून, शहरातील एकूण उपलब्ध २४७५० जागांपैकी २७१७ जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेत प्रवेश न घेऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ९ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत घेण्यात आलेल्या विशेष प्रवेश फेरीत केवळ ३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला
Next
नाशिक : शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेद्वारे आतापर्यंत २२ हजार ३३ विद्यार्थ्यांनी प्रवेशप्र्रक्रिया पूर्ण केली असून, शहरातील एकूण उपलब्ध २४७५० जागांपैकी २७१७ जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेत प्रवेश न घेऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ९ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत घेण्यात आलेल्या विशेष प्रवेश फेरीत केवळ ३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, १३ विद्यार्थ्यांना अर्ज करूनही प्रवेशासाठी संपर्क साधला नसल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले आहे. विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्यासाठी देण्यात आलेली शेवटची संधीही बुधवारी संपली आहे.