लागंगापूर धरणात फक्त ३७ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 01:03 AM2019-03-06T01:03:37+5:302019-03-06T01:06:33+5:30
नाशिक : उन्हाचा तडाखा वाढू लागताच जिल्ह्णातील धरणांच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली असून, मार्च महिन्याच्या प्रारंभीच नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात जेमतेम ३७ टक्के साठा शिल्लक राहिला आहे, तर धरण समूहात ४८ टक्के साठा आहे. जिल्ह्णातील अन्य धरणांमध्ये ३२ टक्के साठा असल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
नाशिक : उन्हाचा तडाखा वाढू लागताच जिल्ह्णातील धरणांच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली असून, मार्च महिन्याच्या प्रारंभीच नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात जेमतेम ३७ टक्के साठा शिल्लक राहिला आहे, तर धरण समूहात ४८ टक्के साठा आहे. जिल्ह्णातील अन्य धरणांमध्ये ३२ टक्के साठा असल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
यंदा पावसाळ्यात जिल्ह्णात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला असून, संपूर्ण हंगामात फक्त ८२ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. त्यातही पावसाचे माहेरघर असलेल्या चार तालुक्यांमध्येच पावसाने चांगली हजेरी लावली. अन्य तालुक्यांमध्ये जेमतेम झालेल्या पावसामुळे धरणांमध्येदेखील ७२ टक्के जलसाठा होऊ शकला. गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास २८ टक्के धरणांमध्ये जलसाठा कमी असल्याने धरणातील पाण्याचे नियोजन करणे अवघड झाले होते. जिल्ह्णातील अन्य धरणांची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. पालखेडमध्ये जेमतेम १० टक्के तर कडवा ९, माणिकपुंज ७ व भोजापूर, भावलीमध्ये ६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
नागासाक्याने कधीच तळ गाठल्याने त्यात पाण्याचा पत्ताच नाही. जिल्ह्णातील सर्व धरणे मिळून जेमतेम ३२ टक्के पाणी साठले असून, गेल्या वर्षी हेच प्रमाण ४८ टक्क्यावर होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढला असून, आता पाण्याची मागणी वाढणार आहे. प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांबरोबरच टंचाईग्रस्त गावांसाठी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी धरणातून पाणी उचलावे लागणार आहे. शिवाय धरणातील गळती व
उन्हामुळे होणाऱ्या बाष्पिभवनाचा विचार करता ऐन मे महिन्यात पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. नाशिककरांवरही पाणीटंचाईचे संकट सुदैवाने जिल्ह्यात यंदा फेब्रुवारी अखेरपर्यंत थंडीची लाट असल्याने पाण्याची मागणी कमी झाली असली तरी, धरणातील गळती, विविध आरक्षणाचा विचार करता धरणांमधून पाणी सोडावे लागले. त्याचाच भाग म्हणून ९२ टक्के भरलेले गंगापूर धरणात मार्चच्या पहिल्या आठवड्यात फक्त ३७ टक्के पाणी शिल्लक राहिले असून, समूहात ४८ टक्के साठा आहे. धरण समूहातील कश्यपी धरणग्रस्तांनी पाणी सोडण्यास विरोध दर्शविल्याने या धरणात १६८६ दशलक्ष घनफूट म्हणजेच ९१ टक्के साठा शिल्लक आहे. त्यामुळे नजीकच्या काळात नाशिककरांनाही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.