जिल्ह्यात केवळ ३८ बाधित, तर २०३ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 01:12 AM2022-02-23T01:12:52+5:302022-02-23T01:13:09+5:30
जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रभाव आता जवळपास संपुष्टात आला असून बाधितांच्या मंगळवारी (दि.२२) नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत केवळ ३२ रुग्णांची वाढ झाली असून तर सुमारे २०३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा कक्ष अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे.
नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रभाव आता जवळपास संपुष्टात आला असून बाधितांच्या मंगळवारी (दि.२२) नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत केवळ ३२ रुग्णांची वाढ झाली असून तर सुमारे २०३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा कक्ष अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे. नाशिक शहरात मंगळवारी २१, जिल्ह्यातील ग्रामीण भागात १६ व एक जिल्हा बाह्य रुग्णांचा समावेश आहे. तर मालेगाव मनपा क्षेत्रात एकही बाधित आढळून आला नाही. कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्येच्या नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पॉझिटीव्हीटी रेट एक टक्क्याच्या खाली घसरला असून सध्या ग्रामीण भागात ०.९९ टक्के रुग्ण संख्या असून नाशिक मनपा क्षेत्रात १.१० टक्के एवढीच रुग्ण संख्या आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचे दडपणही कमी झाले आहे. मात्र जिल्ह्याबाहेरील रुग्ण संख्येचे प्रमाण अजून ३.३३ टक्के असल्याने आरोग्य यंत्रणेला सतर्कता बाळगावी लागत आहे.