जिल्ह्यात केवळ ४४ प्रवेश; तरीही राज्यात आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 01:10 AM2021-06-14T01:10:15+5:302021-06-14T01:10:34+5:30
आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमध्ये उपलब्ध ४ हजार ५४४ जागांवर केवळ एकाच विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित होऊ शकला होता. त्यानंतर तीन दिवसात केवळ ४४ प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आरटीई संकेतस्थळावर अद्यावत करण्यात आली असून उर्वरित राज्यभरात अद्याप एकही प्रवेश निश्चित झालेला नसल्याचे संकतस्थळावर अद्यावत माहितीवरून दिसून येत आहे. त्यामुळे केवळ ४४ प्रवेश निश्चित होऊनही नाशिक जिल्हा आरटीई प्रवेशात राज्यात आघाडीवर आहे.
नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमध्ये उपलब्ध ४ हजार ५४४ जागांवर केवळ एकाच विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित होऊ शकला होता. त्यानंतर तीन दिवसात केवळ ४४ प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आरटीई संकेतस्थळावर अद्यावत करण्यात आली असून उर्वरित राज्यभरात अद्याप एकही प्रवेश निश्चित झालेला नसल्याचे संकतस्थळावर अद्यावत माहितीवरून दिसून येत आहे. त्यामुळे केवळ ४४ प्रवेश निश्चित होऊनही नाशिक जिल्हा आरटीई प्रवेशात राज्यात आघाडीवर आहे.
कोरोना संकटामुळे तीन महिन्यांपासून रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून पुन्हा सुरू झाली असली तरी अद्याप आरटीई प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत नाही. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ४४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून ३ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्राथमिक प्रक्रिया झाली आहे, तर उर्वरित राज्यात अद्याप एकही प्रवेश निश्चित झालेला नाही. राज्यभरात ७८८ विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशाची प्राथमिक प्रकिया केली आहे.
आरटीईअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील ४ हजार ५४४ जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ७ एप्रिलला राज्यस्तरावर प्रवेशासाठीची जाहीर केलेल्या सोडतीत जिल्ह्यातून अर्ज करणाऱ्या १३ हजार ३३० विद्यार्थ्यांपैकी ४ हजार २०८ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. यातील ४४ विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशाची संधी मिळालेल्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांच्या पालकांना ३० जूनपर्यंत प्रवेशाची संधी आहे. काही शाळांकडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही निश्चित झालेले प्रवेश संकेतस्थळावर अपलोड केले नसल्याने असा प्रकार घडत असून शनिवार व रविवारची सलग सुट्टी आल्यामुळे प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प प्रमाणात दिसून येत आहे.
जिल्ह्यातील शाळा - ४५०
उपलब्ध जागा - ४,५४४
विद्यार्थ्यांचे प्राप्त अर्ज - १३,३३०
निवड झालेले विद्यार्थी - ४,२०८
प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी -४४