त्र्यंबकेश्वर तालुक्यात अवघ्या ४५पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 03:57 PM2020-07-27T15:57:07+5:302020-07-27T15:57:41+5:30

त्र्यंबकेश्वर : यावर्षी बळीराजाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली असुन केवळ ४० ते ४५ टक्के पेरण्या झाल्या असुन अद्याप पेरण्या अपुर्ण आहेत. ज्यांनी पेरण्या पुर्ण केल्या आहेत. अशांच्या तोंडचे पाणी पावसाअभावी पळाले आहे. जुन, जुलै अखेर अवघा ४५९ मि मी एवढाच पाउस पडला आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक म्हणावी लागेल.

Only 45 sowings in Trimbakeshwar taluka | त्र्यंबकेश्वर तालुक्यात अवघ्या ४५पेरण्या

त्र्यंबकेश्वर तालुक्यात अवघ्या ४५पेरण्या

Next
ठळक मुद्देदोन महिने संपले पण अद्याप पाउस ४५९ मि.मि. वरच !

लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : यावर्षी बळीराजाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली असुन केवळ ४० ते ४५ टक्के पेरण्या झाल्या असुन अद्याप पेरण्या अपुर्ण आहेत. ज्यांनी पेरण्या पुर्ण केल्या आहेत. अशांच्या तोंडचे पाणी पावसाअभावी पळाले आहे. जुन, जुलै अखेर अवघा ४५९ मि मी एवढाच पाउस पडला आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक म्हणावी लागेल.
त्र्यंबकेश्वर तालुका पावसाचे माहेरघर समजला जातो. पण या वर्षी त्र्यंबकवर पाउस कोपला आहे. एरवी त्र्यंबक शहरासह तालुक्यात दोन महिन्यात १२०० ते १५०० मि. मी. पाउस पडतो आणि लोकांच्या पेरण्या पुर्ण होतात.
श्रावणात शेतीची कामे पुर्ण होउन भाद्रपदात निंदणीची कामे पुर्ण होतात. दरम्यान त्र्यंबकेश्वर जवळ महिरावणी येथे नाशिक जिल्ह्याच्या पुर्वभागात सारखा पाऊस पत असून लागवड झालेली पिके पाण्याखाली गेलेली दिसत आहेत. पण त्र्यंबक परिसरात पावसाचा थेंब नाही. काळे ढग आकाशात गर्दी करतात. जोराचा पाऊस येईल. पण अचानक वारा सुटतो आणि जमलेले ढग वाºयाच्या झोतात विखुरले जातात. असा सद्या खेळ सध्या सुरु आहे.
३१ जुलैपर्यंत मागील पाच वर्षाची आकडेवारी पाहता सन २०१५-३०१ मि.मि., २०१६-८८६ मि.मि., २०१७-१५१० मि.मि., २०१८-१०७८ मि.मि., २०१९-१२७४ मि.मि., तर यावर्षी अवघा ४५९ मि.मि. पाउस पडला आहे. त्यामुळे यावर्षी त्र्यंबकेश्वरला पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. तालुक्यात खरीपाचे २४४०० हेक्टर क्षेत्र असुनही भात, नागली, वरई, खुरसणी, उडीद आदींची पेरणी पुर्ण होउ शकलेली नाही.
या भागातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असते. अर्थात ज्यांच्या शेतात विहीरीचे पाणी उपलब्ध आहे. असे लोक भाताला पाणी भरु शकतात. पण ज्यांच्याकडे विहीरच नाही असे लोक काहीच करु शकत नाहीत. आपल्या डोळ्यासमोर भाताचे पिक नष्ट होतांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे. आज अनेक शेतकऱ्यांची पिके पिवळे पडत चालले आहेत. आता दुबार पेरणीसाठी देखील बळीराजाची आर्थिक कुवत राहीली नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

Web Title: Only 45 sowings in Trimbakeshwar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.