जिल्ह्यासाठी केवळ 558 रेमडेसिविर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 01:50 AM2021-04-22T01:50:42+5:302021-04-22T01:51:00+5:30
नाशिक : कोरोनाच्या थैमानाने उग्र रूप धारण केलेले असताना बुधवारी जिल्ह्याला अवघ्या ५५८ रेमडेसिविरचा डोस प्राप्त झाला आहे. गत आठवडाभरापासून नाशिकला अपेक्षित साठ्याचीदेखील पूर्तता झालेली नाही. त्यामुळे रेमडेसिविरचे मिळालेले डोस जिल्ह्याच्या मागणीच्या दृष्टीने पुरेसे नाहीत.

जिल्ह्यात जिथे दररोज पाच हजारांहून अधिक रुग्णांना रेमडेसिविरची गरज असताना, बुधवारी पुन्हा एकदा मागणीच्या तुलनेत एक दशांश रेमडेसिविरचा पुरवठा होत आहे.
एकेका रुग्णालयालादेखील यापेक्षा अधिक रेमडेसिविर इंजेक्शन लागत असताना प्राप्त झालेली इतकी अत्यल्प इंजेक्शन्स म्हणजे गरजू रुग्णांची थट्टाच असल्याचा सूर नागरिकांकडून व्यक्त झाला.
संकटाचे थैमान सुरू असताना
बहुतांश कोविड रुग्णांच्या नातेवाइकांचे लक्ष रेमडेसिविर कधी मिळणार याकडेच नागरिकांचे लक्ष लागलेले होते.