नाशिक महापालिकेच्या पोस्ट कोविड सेंटरमध्ये केवळ सल्ला मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 06:34 PM2021-05-24T18:34:12+5:302021-05-24T18:37:46+5:30

नाशिक- केारेाना मुक्त झाल्यानंतर देखील रूग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत त्यातच म्युकरमायकोसिसच्या आजारामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर  महापालिकेच्या सहाही विभागात पोस्ट कोविड सेंटर्स सुरू करण्यात येणार आहे. मात्र, ते केवळ रूग्णांना मार्गदर्शन करणारे असणार आहे. त्यात उपचाराची कोणतीही सोय नसणार आहे.

Only advice will be available at Nashik Municipal Corporation's Post Covid Center | नाशिक महापालिकेच्या पोस्ट कोविड सेंटरमध्ये केवळ सल्ला मिळणार

नाशिक महापालिकेच्या पोस्ट कोविड सेंटरमध्ये केवळ सल्ला मिळणार

Next
ठळक मुद्देएफएक्यूची उत्तरे देणार सहाही विभागात रूग्णांना हेाणार मार्गदर्शन

नाशिक- केारेाना मुक्त झाल्यानंतर देखील रूग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत त्यातच म्युकरमायकोसिसच्या आजारामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर  महापालिकेच्या सहाही विभागात पोस्ट कोविड सेंटर्स सुरू करण्यात येणार आहे. मात्र, ते केवळ रूग्णांना मार्गदर्शन करणारे असणार आहे. त्यात उपचाराची कोणतीही सोय नसणार आहे.

महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी सेामवारी (दि.२४) ही माहिती दिली. पहिल्या लाटेपेक्षा केारोनाची दुसरी लाट अधिक भयंकर होती. त्यामुळे नागरीकांचे हाल झाले. परंतु लाखो रूपये खर्च करून रूग्ण बरे झाल्यानंतर देखील आता म्युकरमायकोसिस सारख्या आजारांचा धोका वाढत आहे. नाशिकमध्ये सव्वाशेहून अधिक रूग्ण म्युकरमायकेासिसच्या आजारावर उपचार घेत आहेत. अशाच प्रकारे बरे झाल्यानंतर अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेने पोस्ट कोविड सेंटर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक शहरातील सिडको, सातपूर, नाशिकरोड तसेच पुर्व, पश्चिम आणि पंचवटी विभागात महापालिकेच्या वतीने पोस्ट कोविड सेंटर्स सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आयुक्तांनी वैद्यकीय विभागाला दिलेल्या आदेशानुसार पोस्ट कोविड सेंटरसाठी डॉक्टरांची निवड करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. त्यानंतर हे केंद्र सुरू करण्यात येईल. याठिकाणी फोनवर मार्गदर्शन करण्याची देखील सेाय असेल त्यामुळ एफएक्युनुसार उत्तरे दिली जातील. ती प्रश्नावली तयार करून संबंधीत डॉक्टरांना दिली जाणार आहे. त्यानंतर डॉक्टर नागरीकांशी बोलू शकतील. अर्थात हे उपचार केंद्र नसेल येथे केारोनामुक्त नागरीकांना होत असलेल्या त्रासाबद्दल केवळ मार्गदर्शन आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडे  संदर्भीत केले जाईल असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

Web Title: Only advice will be available at Nashik Municipal Corporation's Post Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.