बूथप्रमुखच शिवसेनेला सत्तेपर्यंत पोहोचवतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:16 AM2021-09-27T04:16:20+5:302021-09-27T04:16:20+5:30
प्रभाग क्रमांक ३० येथे रामनगर अभ्यासिका, कानिफनाथ मंदिर तर प्रभाग क्रमांक ३१ मध्ये कालिकामाता मंदिर, नक्षत्र उद्यान, राजीव नगर ...
प्रभाग क्रमांक ३० येथे रामनगर अभ्यासिका, कानिफनाथ मंदिर तर प्रभाग क्रमांक ३१ मध्ये कालिकामाता मंदिर, नक्षत्र उद्यान, राजीव नगर येथे शिवसेना बूथप्रमुखांचे मेळावे घेण्यात आले. त्यावेळी चौधरी बोलत होते. नाशिक महानगरात शिवसेनेची बूथरचना पूर्ण झाली असून सर्व बूथप्रमुख जोमाने कामाला लागले आहेत. वेळोवेळी बैठका घेऊन त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देऊन सतत प्रोत्साहित करण्यात आले आहे. निवडणुकीच्या दृष्टीने ही यंत्रणा पूर्णपणे सक्षम असून यावेळी महापालिकेत निश्चितच सत्ता परिवर्तन होणारच, असा विश्वास सुधाकर बडगुजर यांनी व्यक्ती केला. महानगरात महिला आघाडीची जोरदार बांधणी सुरू असून प्रत्येक बूथवर त्या सक्रिय असल्याचे जिल्हा महिला आघाडी संपर्क संघटक रंजना नेवाळकर यांनी सांगितले. यावेळी सुनील बागुल, अजय बोरस्ते, विलास शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी संगीता खोडाना, माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी, नगरसेवक डी.जी. सूर्यवंशी, सुदाम ढोमसे, संगीता जाधव, बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, शोभा दोंदे, गुड्डी रंगरेज, वंदना बिरारी, रमेश उघडे, गणेश बर्वे, बालम शिरसाठ, राजेंद्र वाकसरे, नीलेश साळुंखे आदी उपस्थित होते.
(फोटो २६ सेना) - बूथप्रमुखांच्या मेळावा प्रसंगी उपस्थित भाऊसाहेब चौधरी समवेत सुधाकर बडगुजर, सुनील बागुल, अजय बोरस्ते, विलास शिंदे, नेवाळकर, संगीता खोडाना, देवानंद बिरारी, डी.जी. सूर्यवंशी, सुदाम ढोमसे, संगीता जाधव, बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी आदी.