सजग व्यक्तीच समाजात बदल घडवू शकतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:16 AM2020-01-04T00:16:52+5:302020-01-04T00:49:04+5:30
वाचकांना जागरूक बनविण्याचे, जागल्याचे कार्य वाचनालयांच्या माध्यमातून होत असते. अशा सजग झालेल्या व्यक्तीच समाजात बदल घडवू शकतात. अशा स्वरूपाच्या वाचनालयांची संख्या वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले.
नाशिक : वाचकांना जागरूक बनविण्याचे, जागल्याचे कार्य वाचनालयांच्या माध्यमातून होत असते. अशा सजग झालेल्या व्यक्तीच समाजात बदल घडवू शकतात. अशा स्वरूपाच्या वाचनालयांची संख्या वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले.
यावेळी कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयातर्फे शुक्र वारी सार्वजनिक वाचनालयात क्र ांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार तसेच स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन प्रा. सुभाष वारे यांना गौरविण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी कसबे बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष उत्तम कांबळे होते. सद्यस्थितीवर भाष्य करताना कसबे म्हणाले, की देशासमोर मोठी आव्हाने आहेत. यापूर्वीदेखील लढाया झाल्या, रक्तपात झाले, अन्याय झाले, पण माणूस मेला नाही. सध्याची परिस्थिती जनता निवळू शकते. यावेळी उत्तम कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. सुभाष वारे यांनी सद्यस्थितीवर भाष्य केले. सत्तेचा अमरपट्टा जनतेने कुणालाही दिलेला नाही. त्यामुळे संकटात लढत राहावे, असा सल्ला त्यांनी दिला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, राजू नाईक, राजू देसले, डॉ. हेमलता पाटील, डॉ. मनीषा जगताप, दत्तूू तुपे, रविकांत शार्दुल आदी उपस्थित होते. सुवर्णा देसले यांनी मानपत्राचे वाचन केले.
प्रेरणा पुरस्कारार्थी
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार नाशिकचे महादेव खुडे, श्रीकांत पाटील, माया खोडवे, चांदवडच्या सरुबाई भंडारे आणि मुंबईचे संदीप पवार यांना प्रदान करण्यात आला.